agriculture news in marathi, agitation of farmers for several demands,nagar, maharashtra | Agrowon

अकोले तहसील कार्यालयात दूध ओतून सरकारचा निषेध 
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

नगर : दुधाला, शेतीमालाला दर मिळत नसल्याने शुक्रवारपासून (ता. 1) सुरू झालेल्या शेतकरी संपात सहभागी होत अकोले (जि. नगर) येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात घुसून दूध ओतले. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

नगर : दुधाला, शेतीमालाला दर मिळत नसल्याने शुक्रवारपासून (ता. 1) सुरू झालेल्या शेतकरी संपात सहभागी होत अकोले (जि. नगर) येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात घुसून दूध ओतले. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

शुक्रवारपासून राज्यात शेतकरी संपाला सुरवात झाली आहे. त्यात सहभागी होत अकोले येथे किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रोहिदास धुमाळ, महेश नवले, डॉ. कडलग, नामदेव भांगरे, नामदेव साबळे, विलास आरोटे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळी साडेअकरा वाजता कार्यकर्ते तहसील कार्यालयात जमल्यानंतर त्यांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र कार्यकर्त्यांनी गेट उघडून तहसील कार्यालयात प्रवेश केला व दूध ओतून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. 

सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करतेय. गतवर्षी सुरू झालेल्या संपाला एक वर्ष पूर्ण झाले, मात्र सरकारने दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना सुख, समाधान देण्याची सरकारची मानसिकता नाही. शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहे. शेतीमाल, दुधाला दर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे या वेळी डॉ. नवले यांनी स्पष्ट केले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. 
 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...