agriculture news in marathi, agitation of farmers for water issue, nandurbar, maharashtra | Agrowon

रनाळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्नी रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

नंदुरबार  ः बुराई प्रकल्प पूर्ण करून त्यात तापी नदीवरून पाणी आणण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी (ता. २९) सकाळी रनाळे व परिसरातील शेतकऱ्यांनी दोंडाईचा - नंदुरबार मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

नंदुरबार  ः बुराई प्रकल्प पूर्ण करून त्यात तापी नदीवरून पाणी आणण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी (ता. २९) सकाळी रनाळे व परिसरातील शेतकऱ्यांनी दोंडाईचा - नंदुरबार मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकऱ्यांनी सुमारे एक तास हा मार्ग रोखून धरला. रनाळे गावासह परिसरातील सुमारे दोन हजार शेतकरी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या वेळी शासनाच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला. काही राजकीय पक्षांचे पदाधिकारीदेखील या आंदोलनात सहभागी झाले. या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली.  पोलिस व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. शेतकऱ्यांना रस्त्यावरून दूर करण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी केला. परंतु शेतकरी कुणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

बुराई प्रकल्पाचा लाभ नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व साक्री तालुक्‍यासही मिळू शकतो. परंतु या प्रकल्पाचे कामच बंद आहे. बुराई नदीला पाणी फारसे येत नाही. हा अवर्षणप्रवण भाग असल्याने शेती व परिसरातील २०-२२ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. परंतु बुराई प्रकल्पाचे कामच पूर्ण होत नाही. बुराई प्रकल्पात प्रकाशा बॅरेज किंवा तापी नदीतून उपसा सिंचन यंत्रणा कार्यरत करून पाणी पोचविण्यासाठी जलवाहिनीचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू होते. परंतु हे काम बंद पडले. यामुळे बुराई प्रकल्प बारमाही कोरडा असतो. या प्रकल्पाचे काम तातडीने हाती घेतले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नंदुरबार जिल्हा प्रशासनातील अधिकारी व काही लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांसह काही गावांचे सरपंचांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला आणि समजूत काढली. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...