agriculture news in marathi, agitation of farmers,buldhana, maharashtra | Agrowon

शेतकरीप्रश्नी खामगावमध्ये तहसीलदारांना ‘घेराव’
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करीत असून, तातडीने प्रशासकीय यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.१५) प्रशासनाकडे केली. तत्पूर्वी याप्रश्नी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.

बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करीत असून, तातडीने प्रशासकीय यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.१५) प्रशासनाकडे केली. तत्पूर्वी याप्रश्नी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे की, तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय हे महसूल विभागाशी संबंधित असतात. तहसील, कृषी, पणन व बँक हे विभाग शेतकऱ्यांना शासनाच्या अादेशाप्रमाणे कुठलीही माहिती व्यवस्थित देत नाहीत. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर अालेले असताना शेतकरी बँकेत गेले असता, त्यांच्याकडे अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. बँकांनी अाधी असलेली गावे बदलून दिल्याने जुन्या बँका कर्ज देत नाहीत. नवीन बँक कर्जाची फाइल घेण्यास बँक तयार नाहीत.

तालुक्यातील लाखनवाडा या गावात स्टेट बँकेने अाठ दिवसांपासून व्यवहार बंद केले अाहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत माहिती दिली जात नाही. पीकविमा नुकसानभरपाई चुकीची माहिती दिल्याने अत्यंत कमी मिळत अाहे. कृषी विभागात एकाच तारखेत दिलेल्या कांदाचाळीच्या फायलींपैकी काही फाइल्स गहाळ होतात; तर काही जिल्हा कार्यालयात पोचतात. २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना भाव फरक म्हणून दिलेली २०० रुपये प्रतिक्विंटलची रक्कम प्रशासनाकडे पडून अाहे. शासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदी व अाॅनलाइन नोंदी; तसेच मोजमाप झालेली क्रमवारी व धनादेश वाटपाच्या क्रमवारीत तफावत अाहे.

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला असून, तालुक्यात दुष्काळी नियमाप्रमाणे एकही योजना राबविली जात नाही. त्यामुळे कामकाजात तातडीने सुधारणा केली जावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, गिरधर देशमुख, मासूम शहा, श्रीकृष्ण काकडे अादींनी केली.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...