agriculture news in Marathi, agitation if fodder camp will not start, Maharashtra | Agrowon

चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन : शिवसेना
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत महिनाभरापूर्वी अध्यादेश काढला. त्यानुसार चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केले. परंतु, प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. 

याशिवाय तुटपुंजे अनुदान, जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा मंगळवारपासून जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत महिनाभरापूर्वी अध्यादेश काढला. त्यानुसार चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केले. परंतु, प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. 

याशिवाय तुटपुंजे अनुदान, जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा मंगळवारपासून जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन चारा छावण्या मंजुरीबाबत चर्चा करून निवेदन दिले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, राजेंद्र भगत, माऊली शिंदे, रावजी नांगरे, मोहन भिंताडे, संजय आनंदकर, शहाजी राळेभात, शिवाजी कराळे, नाथ वाढेकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने २५ जानेवारी रोजी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार अनेक तालुक्यातून प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्याला अद्याप प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. शासन नियमाप्रमाणे एका शेतकऱ्याची फक्त पाचच जनावरे छावणीत घेण्याची अट आहे. ही अट अतिशय चुकीची असून शेतकऱ्यांकडील सर्व लहान-मोठी जनावरे छावणीत सामील करून घ्यावीत. छावणीतील जनावरांना शासनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, जनावरांसाठी देण्यात येणारे अनुदानही अतिशय तुटपुंजे आहे. मोठ्या जनावरांसाठी ७० रुपयाऐवजी १०० रुपये व छोट्या जनावरांसाठी ३० रुपये ऐवजी ५० रुपये अनुदान देण्यात यावे. चाऱ्याचे भाव सध्या प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे अनुदानात वाढ करणे गरजेचे आहे.

चारा छावणी संस्थांसाठी ऑडिट रिपोर्ट, आयकर रिर्टन अशा जाचक अटी शिथिल कराव्यात. आवश्यक बदल करून प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू केल्या नाही तर मंगळवार (दि. १९) पासून जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...