agriculture news in marathi, agitation for land acquisition issue, mumbai, maharashtra | Agrowon

हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही : मंत्री सुभाष देसाई
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. शिवाय ज्या बागायती जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यांच्या मोबदल्यात उत्तम जमीन देण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकरी आंदोलकांना दिले. 

मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. शिवाय ज्या बागायती जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यांच्या मोबदल्यात उत्तम जमीन देण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकरी आंदोलकांना दिले. 

खंडाळा तालुक्यातील (जि. सातारा) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता.२१) मंत्रालयात मंत्री देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर श्री. देसाई यांनी ही माहिती दिली.
खंडाळा एमआयडीसीत गेलेल्या जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करीत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपूर्वी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघाले होते. गेल्या १० वर्षांपासून या भूसंपादनाला शेतकरी विरोध करीत आहेत, मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. मात्र, रविवारी मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये त्यांना पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या व्हॅनमधून सोमवारी मंत्रालयात आले.

या वेळी मंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. त्यानंतर श्री. देसाई म्हणाले, की खंडाळा टप्पा क्रमांक एकमधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५ टक्के परताव्याची जमीन, टप्पा दोनमध्ये दिली जाईल. टप्पा दोनमधील हरकती असलेल्या जमीन अधिग्रहित करणार नाही. अधिग्रहित बागायती जमिनीच्या मोबदल्यात उत्तर जमीन देण्यात येईल. टप्पा तीनमधील लाभ क्षेत्रातील जमीन वगळण्यात येईल. आतापर्यंत एकंदर ३९२६ नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यात २ हजार ४९० स्थानिकांना रोजगार देण्यात आले आहेत. आणखी नोकऱ्या उद्योग खात्याकडून देण्यात येतील. एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी गावांची पाहणी करून बैठक घेतील. या प्रकरणाच्या विलंबासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी-जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे करतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...