agriculture news in marathi, agitation for milk rate issue, nagar, maharashtra | Agrowon

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले मंत्र्यांना काळे झेंडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु अजूनही अनुदान दिले नाही. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १५) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना काळे झेंडे दाखवले. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात हा प्रकार घडला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु अजूनही अनुदान दिले नाही. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १५) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना काळे झेंडे दाखवले. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात हा प्रकार घडला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दुधाला दर मिळावा यासाठी काही महिन्यांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याला काही महिन्यांचा कालावधी झाला तरी अजूनही सरकारने अनुदान दिलेले नाही. त्याबाबत सरकार अजूनही काही बोलत नसल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते संतप्त आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी महसूल, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील आले होते.

कार्यक्रमात भाषण सुरू असताना आधीच लोकांत येऊन बसलेले ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी अचानक उभे राहत श्री. पाटील यांना काळे झेंडे दाखवून ‘‘भाषणं काय ठोकताय, दुधाच्या अनुदानाचे काय झाले’’, अशी विचारणा केली. अचानक गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कार्यक्रमातून बाहेर नेले. या प्रकारानंतरही चंद्रकांत पाटील यांनी भाषण सुरूच ठेवले.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...