agriculture news in marathi, agitation for mung purchasing with msp, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी बाजार समितीवर कारवाई करू : जिल्हा उपनिबंधक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

परभणी  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डावर आवक झालेल्या शेतीमालाची नोंद घ्यावी. शेतीमालाचे एफएक्यू आणि नाॅन एफएक्यू असे प्रमाणीकरण केल्यानंतरच व्यापाऱ्यांनी खरेदी करावी. प्रमाणिकरणाशिवाय कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी, अन्यथा बाजार समितीच्या संचालक मंडळावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिला.

परभणी  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डावर आवक झालेल्या शेतीमालाची नोंद घ्यावी. शेतीमालाचे एफएक्यू आणि नाॅन एफएक्यू असे प्रमाणीकरण केल्यानंतरच व्यापाऱ्यांनी खरेदी करावी. प्रमाणिकरणाशिवाय कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी, अन्यथा बाजार समितीच्या संचालक मंडळावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिला.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावरील व्यापारी एफएक्यू दर्जाच्या मुगाची खरेदीदेखील ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत. मुळात नाॅन एफएक्यू प्रमाणिकरणासाठीची त्रिसदस्यीय समिती कागदावरच असताना व्यापारी मात्र शेतकऱ्यांकडून शेतमाल नाॅन एफएक्यू असल्याबाबतचे संमतीपत्र घेऊन कमी दराने खरेदी करत शेतकऱ्यांची लूट करत असल्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली कदम, अनंत कदम, अमृतराव शिंदे आदींनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयामध्ये शुक्रवारी (ता. १४) दुपारी मुगाची पोती नेऊन टाकली.

कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली कदम, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, तालुकाध्यक्ष संतोष कदम आदीसह  मार्केट यार्डावरील अडत दुकानांवर जाऊन पाहणी केली.

चांगल्या दर्जाच्या मुगाची खरेदी कमी दराने करण्यासाठी अडते, व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतीमालात काडीकचरा, डाळ असल्यामुळे तो नाॅन एफएक्यू दराने विकण्यास तयार असल्याचे संमती पत्र लिहून घेत असल्याचे या वेळी निदर्शनास आले. काही कोऱ्या संमतीपत्रावर शेतकऱ्यांच्या सह्या आढळून आल्या. ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनाच येताच श्री. सुरवसे यांनी बाजार समितीच्या सभागृहामध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी यांची बैठक घेतली. या वेळी शेतकरी संघनटेचे जिल्हाध्यक्ष माउली कदम, अमृतराव कदम, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, संतोष कदम, बाजार समितीचे सचिव विलास मस्के, व्यापारी महासंघाचे मोतीलाल जैन, गोविंद अजमेरा, सहायक निबंधक जे. एल. पाठक, श्री. राठोड आदी उपस्थित होते.

या वेळी सुरवसे म्हणाले, की बाजार समितीने आवक झालेल्या प्रत्येक शेतमालाचे वजन करून नोंद ठेवावी. शेतीमालाच्या प्रतवारीसाठी बाजार समितीने ग्रेडरची नियुक्ती करावी. बाजार समितीचे सचिव, सहायक निबंधक, तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीने शेतमालाचे एफएक्यू, नाॅन एफएक्यू असे प्रमाणिकरण करावे. प्रमाणिकरण केल्यानंतरच व्यापाऱ्यांनी शेतीमालाची खरेदी करावी. किरकोळ व्यापाऱ्यांनी एका शेतकऱ्यांकडून ५० किलोपेक्षा अधिक शेतीमालाची खरेदी करू नये असे निर्देश देत प्रमाणिकरणा शिवाय खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी अन्यथा बाजार समितीच्या संचालक मंडळावर कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सुरवसे यांनी या वेळी दिला.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...