तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी येथे आंदोलन

परभणी येथे आंदोलन
परभणी येथे आंदोलन

परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे तत्काळ अदा करण्यात यावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना चुकारे मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघनटेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी सांगितले.

गतवर्षीच्या हंगामातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अनेक महिन्यांपासून थकले आहेत. सद्यः स्थितीत शेतीमालाचे दर कोसळले आहेत. व्यापारी कमी दराने खरेदी करत आहेत. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे तूर आणि हरभऱ्याचे चुकारे मिळावेत यासाठी जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन मंगळवारपासून सुरू करण्यात आले.

या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, डिगंबर पवार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मानवत येथेही सुकाणू समितीचे बाळासाहेब आळणे आणि लिंबाजी कचरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचे चुकारे मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे श्री. ढगे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com