चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

परभणी आंदोलन
परभणी आंदोलन

परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता.१७) नागपूर येथे आयोजित बैठकीत दिले. त्यामुळे २६ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकरी उपोषण बुधवारी (ता.१८) स्थगित करण्यात आले.

मंडळ हा निकष धरून संपूर्ण जोखीमेसह विमा परतावा द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यानच्या काळात ठिय्या, चक्काजाम, जिल्हा बंद आंदोलने करण्यात आली. आमदार भांबळे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. परंतु कोणताच तोडगा निघत नव्हता. त्यामुळे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मंगळवारी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आमदार आणि शेतकरी विमा संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांची बैठक झाली.

या वेळी मंडळ घटक धरून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल. चुकीच्या पीक कापणी प्रयोगाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले. बैठकीस कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, आमदार विजय भांबळे, डाॅ. राहुल पाटील, डाॅ. मधुसूदन केंद्रे, माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, विजय गव्हाणे,  राजन क्षीरसागर, विलास बाबर, श्रीनिवास जोगदंड उपस्थित होते. कृषिमंत्री पाटील यांच्या आश्वासनामुळे बुधवारी तहसीलदार विद्याचरण कडावकर यांच्या उपस्थित शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com