agriculture news in marathi, agitation for sugarcane payment, kolhapur, maharashtra | Agrowon

थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात थकविलेली उसाची एफआरपीची रक्कम व त्यावरील व्याज तातडीने द्यावे, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी शिरोळ येथे रविवारपासून (ता. ११) बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली. या वेळी ऊसतोडणीही रोखण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करून गेल्या हंगामातील थकीत बिले मिळाल्याशिवाय यंदा ऊसतोडी करू देणार नाही, असा पवित्रा या संघटनांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात थकविलेली उसाची एफआरपीची रक्कम व त्यावरील व्याज तातडीने द्यावे, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी शिरोळ येथे रविवारपासून (ता. ११) बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली. या वेळी ऊसतोडणीही रोखण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करून गेल्या हंगामातील थकीत बिले मिळाल्याशिवाय यंदा ऊसतोडी करू देणार नाही, असा पवित्रा या संघटनांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील थकीत बिलाचा मुद्दा फारसा महत्त्वाचा न मानून आंदोलन मागे घेतल्याने या कृतीला विरोध दर्शवत आंदोलन अंकुश, बळिराजा शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, जयशिवराय किसान मोर्चा, आदींसह विविध संघटनांनी रविवारपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली.

सकाळी दहा वाजता धनाजी चुडमुंगे, बी. जी. पाटील, प्रदीप पाटील, शिवाजी माने, सुयोग औधकर, समीर पाटील, सुनील गोटखिंडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आंदोलनास प्रारंभ करत उसाने भरलेली वाहने अडविली. या वेळी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत खटके उडण्याचेही प्रकार घडले.

इतर ताज्या घडामोडी
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...