agriculture news in marathi, agitation for sugarcane payment, parbhani, maharashtra | Agrowon

ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा पाटी येथे आंदोलन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस दर घोषित करून गतवर्षीच्या उसाची थकित बाकी आठ दिवसांच्या आत द्यावी, या मागणीसाठी रविवारी (ता.११) परभणी - वसमत राष्ट्रीय महामार्गावरील त्रिधारा पाटी (ता. परभणी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस दर घोषित करून गतवर्षीच्या उसाची थकित बाकी आठ दिवसांच्या आत द्यावी, या मागणीसाठी रविवारी (ता.११) परभणी - वसमत राष्ट्रीय महामार्गावरील त्रिधारा पाटी (ता. परभणी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ऊस उत्पादकांना २०१७-१८ मधील हंगामात गाळप झालेल्या उसाची प्रतिटन एफआरपी अधिक २०० रुपये या प्रमाणे रक्कम अदा करण्यात यावी. यंदाच्या हंगामातील उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दर द्यावा. मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी देखील दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांच्या आत अदा करावी, या मागणीसाठी परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, केशवर आरमळ, रामभाऊ आवरगंड, डिगांबर पवार, शेख जाफर, बाळू पोते, गोविंद खटिंग, गंगाधर जवंजाळ, नामदेव खटिंग, सुधाकर खटिंग, राजू शिंदे आदींसह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...