agriculture news in marathi, agitation for sugarcane payment, solapur, maharashtra | Agrowon

ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी द्यावी यासह यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर उतरत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली, एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी द्यावी यासह यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर उतरत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली, एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

सोलापूर- विजयपूर महामार्गावर वडकबाळ, पुणे -विजयपूर मार्गावर मंद्रुप आणि सोलापूर- पंढरपूर मार्गावर तुंगत येथे हे आंदोलन करण्यात आले. वडकबाळ येथील आंदोलनात विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, सचिव उमाशंकर पाटील, चांद यादगिरी,अब्दुल रजाक मकानदार, बिळ्यानी सुंटे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. तुंगत येथे संघटक विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. विधीसेलचे जिल्हा अध्यक्ष ॲड. विजयकुमार नागटिळक, विद्यार्थी परिषदेचे अजिंक्‍य नागटिळक, नानासाहेब चव्हाण, सोमनाथ घोगरे, सागर इंगळे, महाळाप्पा खांडेकर, विजय पवार, शिवाजी सावंत, आबासाहेब चव्हाण, तुंगचे तंटामुक्त अध्यक्ष इंद्रजित रणदिवे आदी सहभागी झाले.

शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे या महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळित झाली, सरकार आणि कारखानदारांविरोधातील घोषणांनी वातावरण दणाणून गेले. श्री. पटेल म्हणाले, की सिद्धेश्वर, मातोश्री, गोकुळ, आदिनाथ अशा बऱ्याच कारखान्यांकडे बिले थकली आहेत. सतत पाठपुरावा करूनही कोट्यवधींची ऊसबिले मिळत नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना खर्डा भाकरी खाऊन शिमगा करावा लागला. तरीही कारखानदार, सरकारला जाग येत नाही.

अमोल हिप्परगे म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापुरातील राहिलेले ऊसबिल व चालू बिल एफआरपी अधिक दोनशे मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारखानदारांच्या मानगुटीवर बसून आम्ही हे पैसे वसूल करू. श्री. रणादिवे यांनीही तातडीने निर्णय घ्या अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.

शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
ऊसदराच्या मागणीवरून शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेनेही वैराग (ता. बार्शी) येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष हनुमंत कापसे, लहू डिसले, श्रीधर यादव, भैया जगदाळे, हनुमंत वीर, दत्तात्रय कापसे, अशोक कापसे, किसन डिसले, दशरथ कापसे आदींसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास १३ नोव्हेंबरला पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा या वेळी गायकवाड यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...