agriculture news in marathi, agitation for sugarcane price, maharashtra | Agrowon

ऊसदरासाठी वातावरण तापले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पुणे : उसाला ३४०० रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. तरीही साखर कारखान्यांनी अद्यापही उसाचे दर जाहीर न केल्याने सोमवारी (ता. ३०) सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ऊसतोड रोखून पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच ऊस वाहतूक बंद पाडून तर ट्रकची हवा सोडून अांदोलनाचा भडका उडवला. पहिली उचल जाहीर करावी आणि मगच उसाला कोयता लावावा, अन्यथा कारखानदारांविरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

पुणे : उसाला ३४०० रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. तरीही साखर कारखान्यांनी अद्यापही उसाचे दर जाहीर न केल्याने सोमवारी (ता. ३०) सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ऊसतोड रोखून पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच ऊस वाहतूक बंद पाडून तर ट्रकची हवा सोडून अांदोलनाचा भडका उडवला. पहिली उचल जाहीर करावी आणि मगच उसाला कोयता लावावा, अन्यथा कारखानदारांविरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

सातारा जिल्ह्यात पडली  ठिणगी
साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस घालू नये आणि साखर कारखानदारांनीही पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असा पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. ३०) पार्ले येथील ऊसतोड रोखली. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच स्वाभिमानीने ऊसदर आंदोलनाची ठिणगी या निमित्ताने टाकली आहे. कारखान्यांकडून पहिली उचल जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड घेऊ नये आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनीही पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नये, असा पवित्रा घेत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, दादासाहेब यादव, अनिल घराळ, प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ व अन्य कार्यकर्त्यांनी पार्ले येथील ऊसतोड रोखली.

मंगळवेढ्यात उसाच्या ट्रॉलीची हवा सोडली
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही उसाचे दर जाहीर न केल्याने सोमवारी (ता. ३०) सकाळी अरळीतील शेतकऱ्यांनी उसाने भरलेल्या ट्राॅलीची हवा सोडल्याने ऊस दरावरून मंगळवेढ्यात अांदोलनाचा भडका उडाला अाहे. अरळी येथे ऊसतोड करून ट्राॅली भरून जात असताना माजी सरपंच मलसिद्ध कुंभार, अॅड. राजाराम चव्हाण, आप्पासो हेगडकर, कोली मेजर, मल्लिकार्जुन सोनगोंडे, बंडू ढाणे, अशोक कुंभार आदी १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

पंढरपूर तालुक्यात ऊस वाहने परत पाठविली
सोलापूरमध्ये ऊस दर प्रश्‍नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागले आहेत. "स्वाभिमानी'च्या महिला कार्यकर्त्यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेत शिरढोण (ता. पंढरपूर) येथील ऊसतोड बंद करून युटोपियन शुगर व विठ्ठलराव शिंदे कारखान्यांची सहा वाहने परत पाठवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षी पहिली उचल तीन हजार ४०० रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे.

सीमाभागात ऊस वाहतूक बंद पाडली
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराबाबत आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) बहुतांशी शिवारे शांतच राहिली. अनेक ठिकाणी ऊसतोडणी मजुरांच्या ऊस टोळ्या दाखल झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात ऊसतोडणी सुरू असल्याचे चित्र नाही. कर्नाटक सीमा भागातील काही गावांत सुरू असणारी कर्नाटकातील कारखान्यांची ऊस वाहतूक सोमवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. जोपर्यंत दर मिळत नाही; तोपर्यंत तोडी सुरू होऊ न देण्याच्या घोषणा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

वड्डी येथे ऊसतोड रोखली
सांगली जिल्ह्यातील साखर हंगाम सुरू झाला आहे. अनेक भागात कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केली आहे. पहिली उचल किती देणार हे जाहीर न करता साखर कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केल्याचा निषेध करत शेतकरी संघटनेने रविवारी (ता. २९) वड्डी (ता. मिरज) येथे तोड बंद पाडली. शेतकरी संघटनेने फडातून ऊसतोड कामगारांना परत पाठवले. सोमवारी (ता. ३०) दुपारपर्यंत कोठेही ऊसतोड रोखली नव्हती.

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...