agriculture news in marathi, agitation for sugarcane rate issue, sangli, maharashtra | Agrowon

सातारा, सांगली, कोल्हापुरात ऊसदरप्रश्‍नी रविवारी ‘चक्का जाम’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

या सरकारला ‘एफआरपी’चे तुकडे करायचे आहेत. सरकारमधील काही नेत्यांना ही शेतकरी चळवळ मोडीत काढायची आहे. यावर्षी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आम्ही कोणतीच चर्चा करणार नाही. सहकारमंत्र्यांनी ‘एफआरपी’ दिली नाही, तर न्याय मागायचा कोणाकडे. आता आंदोलनाबाबत तडजोड नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार.
- राजू शेट्टी, खासदार

सांगली  : मला उसाला दर हा एकच प्रश्न दिसतोय, यासाठी मी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहे. शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी सरकारने ऊस दराबाबत योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा २०१३ मध्ये जसा उद्रेक झाला होता, त्या प्रमाणे पुन्हा उद्रेक होईल. ऊस दराचा प्रश्‍न तातडीने सोडवला नाही तर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत रविवारी (ता.११) चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जाण्याची हिम्मत नाही. दिल्लीत त्यांना किंमत नाही, हे त्यांना माहीत नसावं का, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

सांगली येथे बुधवारी (ता.७) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की आमच्या ऊस परिषदेत वेगवेगळे ठराव केले होते. उसाला एफआरपी अधिक २०० रुपये असा पहिला ठराव होता. दुसरा ठराव उचलीसंदर्भात होता. तरीदेखील सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी कारखाने सुरू केले. केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘एफआरपी’ आधी द्यावी. ज्या कारखान्यांनी ‘एफआरपी’ दिली नाही, त्यांचा गाळप परवाना रद्द करावा अशा सूचना असताना  मग पोलिस संरक्षणात कारखाने कसे सुरू होतात, असा सवाल त्यांनी केला. हे सरकार शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे आहे. या भाजपमध्ये पैसे बुडवणारे हे बहुतांश कारखानदार आहे. आम्ही या सरकारला धडा शिकवू, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी ऊस दराबाबत जी भूमिका घेतली त्याचे आम्ही समर्थन केले. पण या मागणीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेद दिला. मग सरकारची वेगळी भूमिका आहे काय, हे स्पष्ट करावे. सरकार फक्त घोषणा करत आहे. केवळ घोषणा करून प्रश्न सुटत नाहीत. कारखानदार कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत. अनेक भागात ऊस तोड सुरू आहे. ऊस घेऊन जातो आणि जमेल तेवढे पैसे देतो असे चालणार नाही. कारखाने असेच सुरू राहिले तर आमच्या मागण्या मान्य झाल्या असे आम्ही समजू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करण्यास तयार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने सांगत आहेत. मग घोडे अडलेय कुठे. या स्थितीत आम्ही शनिवारपर्यंत (ता.१०) थांबू, ऊस दराबाबत मागण्या मान्य न झाल्यास साताऱ्यासह दक्षिण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
 

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...