agriculture news in marathi, agitation for sugarcane rate issue, satara, maharashtra | Agrowon

एकरकमी एफआरपीसाठी कऱ्हाड येथे आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

कऱ्हाड, जि. सातारा   ः एफआरपी आमच्या हक्काची... नाही कोणाच्या बापाची..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय राहत नाय... एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे... अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १२) एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन केले. संघटनेच्या वतीने कारखान्यांच्या गटआॅफिसला टाळे ठोकून, ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. येत्या आठ दिवसांत एफआरपी न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

कऱ्हाड, जि. सातारा   ः एफआरपी आमच्या हक्काची... नाही कोणाच्या बापाची..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय राहत नाय... एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे... अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १२) एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन केले. संघटनेच्या वतीने कारखान्यांच्या गटआॅफिसला टाळे ठोकून, ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. येत्या आठ दिवसांत एफआरपी न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी यापूर्वी साखर कारखानदार, साखर आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र त्याची दखल कारखानदारांनी घेतली नाही. त्यामुळे शनिवारी साखर कारखान्यांच्या गटआॅफिसला टाळे ठोको आंदोलन करण्यात आल्याची सातारा जिल्हाध्यक्ष श्री. नलवडे यांनी सांगितले.  येथील दत्त चौक परिसरातील कृष्णा कारखान्याच्या गट आॅफिसमध्ये जाऊन काही काळ ठिय्या मारून पुन्हा कार्यालयाच्या दाराला टाळे ठोकण्यात आले. रयत कारखान्याच्या कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर बोलताना श्री. नलवडे यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा कारखानदार जर मोडणार असतील, तर आम्हीही कायद्याचा भंग करून आंदोलन करू. ज्याप्रमाणे सरकार आम्ही आंदोलन करताना कायद्याचा धाक दाखवते. त्याप्रमाणे कायदा तोडणाऱ्या साखर कारखानदारांनाही धाक दाखवून त्यांना तुरुंगात डांबावे. आठ दिवसांत सर्व कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे जर बिले जमा केली नाहीत तर संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करू. याची जबाबदारी साखर कारखानदार आणि प्रशासनाची राहील, असाही इशारा त्यांनी दिला.

या वेळी संघटनेचे विकास पाटील, शिवाजी पाटील, लालासाहेब साळुंखे, मनोज जाधव, कृष्णत क्षीरसागर, सज्जन माने, प्रकाश धोकटे, कृष्णा मदने, सुभाष नलवडे, योगेश झांबरे, अमर कदम, तुकाराम खोचरे, सागर माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...