agriculture news in marathi, agitation for water, aurangabad, maharashtra | Agrowon

पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

टॅंकर बंद झाल्याचे कार्यालयास कळविले असून, टॅंकरची मागणी केलेली आहे. कंत्राटदारांनी उद्या, परवा देतो असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत टॅंकर सुरळीत सुरू झालेले नाही. आजच टॅंकर सुरू करण्यात येणार आहेत. 
- एस. डी. महाजन, ग्रामविकास अधिकारी, किनगाव.
 

रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी भीषण पाणीटंचाई व त्यातच पाण्यासाठी सुरू असलेले टॅंकर बंद झाल्याने सोमवारी (ता. २०) ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.  

अंबड तालुक्‍यातील किनगाव येथे मागील सहा ते सात दिवसांपासून टॅंकर बंद झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. डोंगराळ, मुरमाड, खडकाळ भाग असल्याने व अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने या भागात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. अंबड तालुक्‍यात सुरवातीलाच किनगावला टॅंकर सुरू करण्यात आले होते. 

डिसेंबर महिन्यापासूून गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यात सर्वांत जास्त पाणीटंचाई जाणवत असताना टॅंकर बंद झाल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  येत्या दोन दिवसांत टॅंकर सुरू न केल्यास अंबड तहसील कार्यालय व पंचायत समितीवर मोर्चा काढणार असल्याचे महिलांनी सांगितले. संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून टॅंकर सुरू होईपर्यंत ग्रामपंचायतीतच बसून राहण्याचा पवित्रा घेतला. या वेळी सरपंच सुलोचनाबाई वाघ, ग्रामविकास अधिकारी यांनी तत्काळ टॅंकर सुरू करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया

गावाच्या परिसरात पाणी नसल्याने दोन ते तीन किलोमीटरवरून डोक्‍यावर पाणी आणावे लागत आहे.
- चंद्रकला रावसाहेब वाघ, किनगाव

टॅंकर बंद झाल्याने उन्हातान्हात दुरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे चांगलाच त्रास होत आहे. 
- कविता चौधरी, ग्रामस्थ, किनगाव.
---

इतर बातम्या
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
नाशिक जिल्ह्यात भात लागवडीपूर्व कामे...नाशिक  : जिल्ह्यात भात उत्पादन घेणाऱ्या अनेक...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत...परभणी : जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...