agriculture news in marathi, agitation for water, pune, maharashtra | Agrowon

वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ८, ९, १० आणि ११ यामधून पिण्यासाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी सदोबाचीवाडी होळ परिसरातील नागरिकांनी वडगाव निंबाळकर पाटबंधारे कार्यालयात रविवारी सकाळी ठिय्या मांडला. 

वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ८, ९, १० आणि ११ यामधून पिण्यासाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी सदोबाचीवाडी होळ परिसरातील नागरिकांनी वडगाव निंबाळकर पाटबंधारे कार्यालयात रविवारी सकाळी ठिय्या मांडला. 

या परिसरातील शेतीसाठी पाण्याचे आवर्तन झाले आहे. याला बराच कालावधी लोटला आहे. या वितरकांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी वितरकांच्या कडेला आहेत. लाभधारक शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी अत्यल्प प्रमाणात दिले गेले. यामुळे पिकांनाही पुरेसे पाणी मिळाले नाही. पूर्वनियोजित नसणाऱ्या शेतकऱ्यांनीही वितरिकेचे पाणी घेतले; परिणाम लाभधारक शेतकऱ्यांना पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. ठराविक कोठा पूर्ण झाल्यावर आवर्तन थांबवण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. आता शेवटच्या टप्प्यात तरी लोकवस्तीला पिण्यापुरते पाणी सोडावे, या मागणीसाठी सदोबाचीवाडी होळ परिसरातील शेतकरी कार्यालयासमोर एकत्र आले, सुरवातीला आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली होती, पण आचारसंहिता असल्यामुळे आंदोलन न करता पाटबंधारे कार्यालयाच्या दारात शेतकरी बसून राहिले. 

यामध्ये सरपंच विलास होळकर, उपसरपंच विनोद भोसले, दीपक होळकर, सतीश सूर्यवंशी, विजयकुमार निंबाळकर यांच्यासह सुमारे शंभर ग्रामस्थ उपस्थित होते. पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार होळकर, पाटबंधारे शाखाधिकारी बाजीराव पोंदकुले, शरद मोरे यांनी ग्रामस्थांचे मत ऐकून घेतले; आपली मागणी वरिष्ठांपर्यंत पोचवली जाईल, असे शाखाधिकारी पोंदकुले यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...