agriculture news in marathi, agitation for water rotation, parbhani, maharashtra | Agrowon

निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना नदीकाठच्या ११ गावांतील पाणीपुरठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे निम्म दुधना धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी; तसेच जनावरांना पिण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडावे, या मागणीसाठी मानवत तालुका दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीतर्फे शनिवारी (ता.१८) मानवतरोड (जि.परभणी) येथे पाथरी-परभणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना नदीकाठच्या ११ गावांतील पाणीपुरठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे निम्म दुधना धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी; तसेच जनावरांना पिण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडावे, या मागणीसाठी मानवत तालुका दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीतर्फे शनिवारी (ता.१८) मानवतरोड (जि.परभणी) येथे पाथरी-परभणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून, मानवत तालुक्यातील दुधना नदीकाठच्या सोन्ना, गोगलगाव, सावंगी (मगर), इरळद, नरळद, मंगरुळ, कोथाळा, पार्डी, राजुरा, शेवडी (ज.), टाकळी या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीतर्फे निम्म दुधना प्रकल्पाच्या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु धरणातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पाथरी ते परभणी राष्ट्रीय महामार्गावरील मानवतरोड येथे दुष्काळ व पाणीटंचाई निवारण संघर्ष समितीचे बाळासाहेब आळने, लिंबाजी कचरे पाटील, रामराजे महाडिक, शिवशंकर पाते, भगवान मुळे, अशोक बुरखुंडे, सुभाष देशमुख, दत्तराव मगर, रमेश कदम, दादासाहेब देशमुख, कल्याण मगर, कोडिंबा पाते, अशोक बारहाते, अण्णासाहेब मगर, अंबादास तुपसमिंद्रे आदींसह ११ गावांतील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...