agriculture news in marathi, Agri based countries to be highly impacted by global warming , Maharashtra | Agrowon

हवामान बदलाचा कृषिप्रधान देशांना धोका
वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

तापमानात एक अंश सेल्सिअस वाढ झाली तरीही भारताला वाईट हवामाच्या अतिरेकाचा सामना करावा लागेल. तापमान जर १.५ अंश सेल्सिअस वाढ झाल्यास त्याचे परिणाम भयंकर करतात. ‘आयपीसीसी’च्या ताज्या अहवालातून आपल्याला शेवटचा इशारा मिळाला आहे. सर्वांनी आता आणि तोबडतोब एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. 
- सुनीता नरेन, महासंचालक, विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (सीएसई)

नवी दिल्ली ः हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होईल, दुष्काळ आणि पूर यांसारख्या आपत्तींच्या घटनांमध्ये आणि उष्णतेच्या लाटांमध्ये वाढीचा प्रत्यय जगाला येणार आहे. या सर्व आपत्तींचा सर्वाधिक फटका हा भारताच्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या कृषिप्रधान देशांना जास्त बसेल, असे पर्यावण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ने (आयपीससी) नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात तज्ज्ञांनी हवामान बदलाच्या धोक्याची सूचना दिली आहे.

‘आयपीसीसी’ अहवालात म्हटले आहे, की ५ अंश सेल्सिअस तापमान वाढ ही आधी अपेक्षित असलेल्या वाढीपेक्षा अधीक आहे. या वाढीचा गरीब आणि भारतासारख्या विकसनशील देशांसाठी खूपच विनाशकारक ठरू शकते. ग्लोबल वार्मिंगचे परिणाम टाळण्यासाठी समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व प्रमाणात परिवर्तन करावे लागणार आहे. हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सध्याच्या पातळीवर २०३० पर्यंत जागतिक तापमानात १.५ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यासाठी २०५० ची वाट पाहण्याची आवश्यता नाही. ग्लोबल वार्मिंगच्या विरुद्ध लढण्यासाठी जागतिक युतीमध्ये अमेरिकेच्या भूमिकेने अडथळे निर्माण होत आहेत. अमेरिकेच्या या भूमिकेविरुद्ध जगभरातील इतर देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. 

विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) म्हटले आहे, की ग्लोबल वार्मिंगविरुद्ध लढण्यासाठी जगाला ‘प्लॅन बी’ची आवश्यकता आहे. भारताने जागतिक तापमानची पातळी वाढण्याआधी गरीब आणि असुरक्षित लोकसंख्येला वाचविण्यासाठी जागतिक युतीसाठी पुढाकार घ्यावा. 
‘सीएसई’चे उपमहासंचालक चंद्रा भूषण म्हणाले, की १.५ अंश सेल्सिअस वाढ ही आधी अपेक्षित असलेल्या वाढीपेक्षा अधिक आहे. यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होईल, दुष्काळ आणि पुराच्या घटना वारंवार घडतील, उष्ण दिवस आणि उष्णतेच्या लाटा, अधिक तीव्र उष्णकटिबंधीय वादळ आणि समुद्राचा अम्लीकरण आणि खारटपणा वाढेल. शेती आणि मासेमारी क्षेत्रावर अवलंबून जास्त लोकसंख्या असलेल्या देशांना याचा जास्त फटका बसणार आहे. 

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • जागतिक तापमानात २०३० पर्यंत १.५ अंश सेल्सिअस वाढ होईल
  • शेती आणि मासेवरीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येला धोका
  • अमेरिकेची भूमिका जागतिक एकीत अडथळा आणणारी
  • ‘प्लॅन बी’ची आवश्यकता असून भारताने पुढाकार घ्यावा
  • पीक उत्पादकतेत घट, हवामानची संकटे यामुळे २०१५ पर्यंत गरिबी वाढेल
  • जगाने तातडीने एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज

इतर अॅग्रो विशेष
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...