agriculture news in Marathi, agri commissioner cleared dust from files, Maharashtra | Agrowon

नव्या आयुक्तांनी झटकली कृषी खात्याच्या फायलींवरील धूळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे : कृषी खात्यात आयुक्तालयापासून गावपातळीपर्यंत आलेली मरगळ झटकण्यासाठी विद्यमान कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवारी कार्यालयात पाचारण करून आयुक्तांनी सर्व फायलींवरील धूळ झटकून कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यास भाग पाडले. 

पुणे : कृषी खात्यात आयुक्तालयापासून गावपातळीपर्यंत आलेली मरगळ झटकण्यासाठी विद्यमान कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवारी कार्यालयात पाचारण करून आयुक्तांनी सर्व फायलींवरील धूळ झटकून कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यास भाग पाडले. 

शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्यासाठी प्रशासकीय कागदपत्रांचे वर्गीकरण हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. बहुतेक कार्यालयांमध्ये फाइल्सचे वर्गीकरण झालेले नसल्यामुळे पुणे मुख्यालयापासून ते गावपातळीपर्यंत कागदपत्रे धूळ खात पडलेली होती. आयुक्तांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी २८ व २९ ऑक्टोबरला सुटीच्या दिवशी कामावर येण्याचे फर्मान काढले होते. 

‘‘दिवाळीमधील सुट्यांचा माहोल कायम असताना आयुक्तांनी सुटीच्या दिवशी कामावर बोलविल्यामुळे अनेक कर्मचारी अनुत्सुक होते; मात्र आयुक्त स्वतःदेखील सुटी न घेता कामकाज करणार होते, तसेच सर्व संचालकांना अचानक भेटी देण्याचादेखील आदेश आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे सुटीच्या दिवशी कर्मचारी उपस्थित राहिलेच; पण अपेक्षेप्रमाणे कागदपत्रांवरील धूळ झटकून वर्गीकरणाची मोहीम जोरदारपणे राबविण्यात आली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यातील शेतकरीवर्गाच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले कृषी आयुक्तालय हे कृषी योजनाविषयक कामकाजाचे मध्यवर्ती स्थान आहे. योजनांची चांगली अंमलबजावणी आणि जलद सेवा ही बाब केवळ फायलींच्या (नस्ती) वर्गीकरणावर अवलंबून असते; मात्र आयुक्तालयात ‘ड’ (अनावश्यक कागदपत्रे) वर्गीय कागदपत्रे व अभिलेख मोठ्या प्रमाणात पडून आहेत. जुनाट कागदांमुळे अस्वच्छता वाढून कर्मचारीवर्गाचा उत्साह कमी होतो, असे आयुक्तांना आढळून आल्यामुळेच ही मोहीम सुरू करण्यात आली. 

चांगला पगार मिळतो..चांगली सेवाही द्या..!
कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी काही कार्यालयांना अचानक भेटी दिल्या. त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्याला शासनाकडून चांगला पगार मिळतो मग चांगली सेवादेखील दिली पाहिजे. कामकाजाची जागा स्वच्छ असावी व त्यामुळे मन प्रसन्न राहते. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे लवकर होतात. यातून शासनाचा हेतू सफल होतो, असे आयुक्तांनी सूचित केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...