agriculture news in Marathi, agri commissioner revived of pomegranate, Maharashtra | Agrowon

कृषी आयुक्तांकडून डाळिंबावरील रोगाचा आढावा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

आयुक्तांनी तेलकट डाग रोगाबाबत गावोगावी जाऊन जागृती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेलकट रोग मुक्त डाळिंबाच्या बागा करण्याचे अभियान हाती घेतले आहे.
- मकरंद कुलकर्णी, 
कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सांगली.

सांगली ः राज्यातील आंबे बहारातील डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबात कृषी आयुक्तांनी आढावा घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना तेलकट डाग  रोगाबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात बदलत्या वातावरणमुळे आंबे बहरातील सुमारे ५०  टक्के डाळिंबाला तेकलट डाग रोगाने घेरले आहे. यामुळे डाळिंबउत्पादक अडचणीत सापडले आहेत. अशी बातमी (ता. १५) दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुणे आयुक्त कार्यालयात सर्व जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत बातमीचा आधार घेत कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व कृषी अक्षीक्षक कार्यालयांना तेकलट डाग रोगाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कृषी आयुक्तांनी जिल्हा कृषी कार्यालयाने उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात तेकलट डाग रोगाने बाधित झालेल्या डाळिंबाची पाहणी करावे, असे आदेश दिले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन रोगाबाबत जनजागृती करण्याचे नियोजन सुरु केले आहे. गावोगावी तेकलट डाग रोगमुक्त बागा करण्याचे अभियान हाती घेतले आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत तालुक्‍यात कृषी विभागाने तेकलट डाग रोगाबाबत जनजागृती केल्या पंधरा दिवसांपासून सुरू केले आहे. या तालुक्‍यात याबाबत बैठकाही घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार कृषी विभाग काम करत आहे.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...