शेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी आयुक्त

चैत्रपालवी कार्यक्रम
चैत्रपालवी कार्यक्रम

बारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक पिकाला जागतिक बाजारभाव अधिक कसा मिळेल याचा विचार कृषी विभाग करीत असून १२ ते १५ पिकांसाठी तब्बल २२०० कोटींचा प्रकल्प सध्या राज्यात राबविला जात आहे, शेतकऱ्यांना व्यापारी बनविण्यावर आमचा भर असल्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी शारदानगर येथे सांगितले. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या चैत्रपालवी परीषदेचे रविवारी (ता.२६) शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात उदघाटन झाले. यावेळी कृषी आयुक्त दिवसे बोलत होते. या वेळी माजी कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सहसंचालक दिलीप झेंडे, मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, डॉ. शंकरराव मगर, राजीव देशपांडे, डॉ. सुधीर भोंगळे, केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली आदी उपस्थित होते. दिवसे म्हणाले, की आपला देश मध्यमवर्गाकडे निघाला आहे. याचा अर्थ देशात देखील बाजारपेठ आहे, मागणी आहे म्हणूनच शेतकऱ्याला उत्तम व्यापारी बनवायचे असेल तर उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंतची व विक्रीपर्यंतची साखळी मजबूत करावी लागेल. शेतकऱ्यांनी फक्त निर्यातीचा दुराग्रह सोडला तर देशातही खूप चांगली बाजारपेठ आहे, ग्राहक पैसे मोजायला तयार आहेत. मात्र त्यासाठीच्या सुविधा आपल्याकडे आहे काय? याचा विचार करावा लागेल. बापजाद्यांच्या पारंपरिक शेतीला सोडून आपल्याला नव्या काळाचा विचार करून शेती करावी लागेल. व्यवस्थापनही त्याच अंगाने करावे लागेल. कम्युनिकेशन कोलॅब्रेशन आणि कॉन्स्ट्रेशन या त्रिसूत्रीवर भर  द्यावा लागेल.  डॉ. सुधीरकुमार गोयल म्हणाले, की शेतीत समृद्धी आणण्याचा संकल्प आता शेतकऱ्यांना करावा लागेल, त्यासाठी चैत्रपालवीसारख्या कार्यशाळा उपयोगी पडतील. ज्या शेतकऱ्यांनी शेती चांगली केली, त्यांनी उत्पन्न कसे चांगल्या प्रकारे मिळवले याचा अभ्यास करावा. राजेंद्र पवार म्हणाले, की चैत्रपालवी एक नव्या वाटांचा धांड़ोळा आहे म्हणून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता आपल्याला माहिती असलेले कृषी तंत्र व ज्ञान आपल्या भागातील शेतकऱ्यांना देऊन प्रशिक्षित करावे. नोकरी करणारा, उच्चशिक्षित शेतीबाहेर राहुन चालणार नाही, शेतीचे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणारी उच्चशिक्षितांचीही पिढी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com