agriculture news in marathi, Agri commissioner says, licence will cancel if manure wil not on e-poss, Maharashtra | Agrowon

ई-पॉस न वापरल्यास परवाना निलंबित करा : कृषी आयुक्त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

राज्यात पॉस मशिन ताब्यात असून, रासायनिक खतांची विक्री न करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेतला जाणार आहे. अशा विक्रेत्यांकडून मशीन काढून घेतले ते नव्या विक्रेत्यांना दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.
- विजयकुमार इंगळे, संचालक, कृषी आयुक्तालय

पुणे: राज्यात पॉस मशिनवर शेतकऱ्यांना रासायनिक खते न देणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करा, असे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. देशात अनुदानित खताची विक्री गेल्या नोव्हेंबरपासून पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनवर बंधनकारक करण्यात आली. रसायने व खते मंत्रालयाने महाराष्ट्राकरिता श्री. दलजितसिंग यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्तीदेखील केली आहे.

खत विक्री किंवा वाटपात कुठेही अनागोंदी होत असल्यास तसेच शेतकऱ्यांच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्यास थेट केंद्र सरकारकडे माहिती पाठविली जाते. प्रत्येक जिल्ह्यात खत वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. ‘‘शेतकऱ्याने आधार नंबर व अंगठयाचा ठसा दिल्यानंतर पॉसवर खताची विक्री केली जाते. मशिनवर झालेल्या व्यवहारानंतरच खत कंपन्यांना केंद्र शासनाकडून अनुदान मिळते. मात्र, राज्यात काही विक्रेते हेतुतः या पॉसचा वापर करीत नाहीत. यापुढे अशा विक्रेत्याचा परवाना निलंबित केला जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

कृषी आयुक्तांनी अलीकडेच गुण नियंत्रण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर या सूचना देण्यात आल्या. राज्यात सुरू असलेल्या अनोंदणीकृत कृषी निविष्ठा अर्थात पीजीआरची (संजिवके, टॉनिक) सर्व जिल्ह्यांत तपासणी करण्याचादेखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘‘आयुक्तांच्या सूचनेनुसार राज्याचे मुख्य गुण नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबरपासून पीजीआरच्या राज्यव्यापी तपासणी मोहिमेला सुरवात होईल. ही मोहिम सहा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. मोहीम संपताच ४८ तासांत आयुक्तालयात अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत’’, असे गुण नियंत्रण निरीक्षकांनी स्पष्ट केले. 

गुण नियंत्रण विभागाने आता मुख्य रासायनिक खतांव्यतिरिक्त अन्य खतांच्या गुणवत्तेचादेखील शोध घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार स्फुरदयुक्त सेंद्रिय खते, सेंद्रिय खतांचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील गुण नियंत्रण निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 

 

इतर अॅग्रो विशेष
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
`डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ...शिर्डी, जि. नगर ः डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या...
खरिपात झाला केवळ ५२ टक्के कर्जपुरवठापुणे : पीक पतपुरवठा आराखड्याच्या शेतकऱ्यांना कर्ज...
हुडहुडी वाढलीपुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
दूध पावडर निर्यात योजनेचाही फज्जापुणे : राज्य सरकारवर विश्‍वास ठेवून कमी भावात दूध...
महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विम्याची नोंदनवी दिल्ली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन...
पंधरा हजार धरण, तलावांतील गाळ काढणार :...मुंबई : राज्यातील छोटी धरणे, तलाव यांमधील...
‘माफसू’ उभारणार पशुविज्ञान संग्रहालयनागपूर ः मुलांना प्राणीशास्त्र कळावे त्यासोबतच...
राज्यात शनिवारपासून महारेशीम अभियाननागपूर   ः रेशीमशेतीला प्रोत्साहन मिळावे, या...
बदलत्या वातावरणामुळे केळी निसवणीवर...जळगाव ः थंड, विषम वातावरणामुळे खानदेशात केळीच्या...
सारंगखेड्याचा ‘चेतक महोत्सव’ आजपासून मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे...
दूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची...मुंबई: दुधाच्या पॉलिथीन पिशव्यांच्याबाबतीत राज्य...
सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून सात हजार...मुंबई : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत...
‘सेमीफायनल’मध्ये भाजपला झटकानवी दिल्ली ः लोकसभेची दिशा ठरविणाऱ्या आणि अतिशय...
नगरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश...पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत...
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...