agriculture news in Marathi, Agri commissioner says officers have responsibility of agriculture development, Maharashtra | Agrowon

कृषी खात्याला दिशा देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच ः आयुक्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे: कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचे काम केवळ सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित नसून, कृषी खात्याला दिशा देण्याची जबाबदारीदेखील तुमचीच आहे, असे उद्गगार कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना काढले.  

पुणे: कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचे काम केवळ सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित नसून, कृषी खात्याला दिशा देण्याची जबाबदारीदेखील तुमचीच आहे, असे उद्गगार कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना काढले.  

‘एनएचएम’ व विस्तार विभागाचे संचालक डॉ. सु. ल. जाधव यांच्या निवृतीनिमित्ताने आयुक्तालयाने आयोजित केलेल्या निरोपसोहळ्यात श्री. सिंह बोलत होते. या वेळी फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे, सुभाष खेमनर, मच्छिंद्र घोलप व्यासपीठावर होते. ‘गेली ३२ वर्षे कृषी विस्ताराची आदर्श सेवा करणारे श्री. जाधव हे कृषी खात्यातील प्रत्येक जबाबदारी संयम व कौशल्याने पार पाडत होते. ते आमचा आदर्श होते,’ अशी भावना सर्व अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली. 

या वेळी आयुक्त म्हणाले, की सरकारी खात्यातून निवृत्त होताना फार कमी अधिकाऱ्यांच्या वाट्याला अशा स्वरूपाच्या सदिच्छा येतात. श्री. जाधव यांचे काम कृषी आयुक्तालयासाठी मैलाचा दगड आहे. अधिकारी म्हणून समाजाचे देणे लागतो ही भावना ठेवत त्यांनी सेवा केली. श्री. पोकळे यांनी जाधव यांच्या कामकाजाबाबत दिलेली माहिती त्यांचे कृषी सेवेचे महत्त्व सांगणारी आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत राहून सतत शिकले पाहिजे. कारण शेती व शेतकरी हेच आपले मुख्य घटक आहेत. 

आयुक्तालयाकडून या वेळी श्री. जाधव व सौ. जाधव यांचा गौरव करण्यात आला. श्री. पोकळे म्हणाले, की कृषी खात्यात जयंत देशमुख, के. एन. देशमुख, एस. एल. जाधव आणि मी आमची घट्ट मैत्री होती. श्री. जाधव यांनी कृषी खात्याच्या सर्व योजनांमध्ये तसेच अडचणीतदेखील उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्यात व माझ्यात गेल्या ३८ वर्षांत एकदाही मतभेद झाले नाहीत. आम्ही दोघांनी अतिशय आव्हानात्मक स्थितीत कृषी खात्यात भरपूर कामे केली. आता स्थिती वेगळी असून ९० टक्के डीबीटी लागली आहे. अजूनही पुढे सुधारणा होतील. मात्र, श्री. जाधव यांची उणीव आम्हाला कायम भासत राहील. 

प्रल्हादराव पोकळे आता आयुक्तालयाचे पालक 
कृषी आयुक्तालयात श्री. जाधव व श्री. पोकळे यांच्या प्रशासकीय निर्णयावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिशा मिळत होती. श्री. जाधव यांच्यानंतर आता श्री. पोकळे यांच्याकडेच ‘पालक’ म्हणून सर्वजण पाहत आहेत, असा उल्लेखदेखील कृषी अधीक्षक अधिकारी दादासाहेब सप्रे यांनी या वेळी केला. राज्यातील सर्व कृषी सहसंचालक व आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीदेखील या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...