agriculture news in marathi, agri commissionr writes CICR on htbt seed report | Agrowon

बियाणे अहवालप्रकरणी आयुक्‍तांचे ‘सीआयसीआर’ला पत्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नागपूर : एका खासगी कंपनीचा बियाणे अहवाल बदलल्याप्रकरणी केंद्रीय कापूस संशोधन संस्थे (सीआयसीआर)च्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कृषी आयुक्‍तांनी या प्रकरणी ‘सीआयसीआर’कडून अहवाल मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर : एका खासगी कंपनीचा बियाणे अहवाल बदलल्याप्रकरणी केंद्रीय कापूस संशोधन संस्थे (सीआयसीआर)च्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कृषी आयुक्‍तांनी या प्रकरणी ‘सीआयसीआर’कडून अहवाल मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

कृषी विभागाने हंगामाच्या सुरवातीला कापूस बियाण्यांचे नमुने घेत ते तपासणीसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे पाठविले होते. कापूस संशोधन संस्थेने या नमुन्यांची तपासणी करीत एका खासगी कंपनीचे बियाण्यात एच.टी. (हर्बिसाइड टॉलरंट) जनुक असल्याचा अहवाल दिला. या अहवालाच्या आधारेच कृषी विभागाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. यानंतर अवघ्या दोन दिवसांत घडलेल्या घडामोडीत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने आपल्या पहिल्या अहवालापासून घूमजाव केले. 

एच.टी. संदर्भातील पहिला पॉझिटिव्ह अहवाल चुकीच्या तपासणीअंती दिल्या गेल्याचे सांगत दुसरा निगेटिव्ह अहवाल कृषी विभागाकडे ई-मेलद्वारे पाठविण्यात आला. बियाणे कंपनीने त्याच आधारे न्यायालयात धाव घेत आपल्यावरील फौजदारी गुन्हा मागे घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी १० डिसेंबरला कृषी विभागाला आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. यामुळे कृषी विभागासोबतच केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अडचणीतही वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या प्रकरणाची दखल घेत राज्याचे कृषी आयुक्‍त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला पत्र लिहिल्याची माहिती आहे. बियाणे तपासणी संदर्भातील एकूण प्रक्रिया आणि पहिला आणि दुसरा अहवाल या संदर्भाने या पत्रात विचारणा केल्याचे आयुक्‍तालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या पत्राला २० ते २५ दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्यापपर्यंत ‘सीआयसीआर’कडून कोणताच खुलासा या संदर्भाने केला गेला नाही, असेही सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...