agriculture news in marathi, agri cooperative society's demands for four months interest on loan | Agrowon

चार महिन्यांच्या व्याजाची सोसायट्यांकडून मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफी व नियमित कर्जदारांना सवलतीसंबंधी ३६९ कोटी रुपये निधी प्राप्त होऊन जवळपास २० ते २२ दिवस झाले. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात है पेसे जमा झालेले नाहीत. कर्जखाते अजूनही एनपीएमध्येच आहेत. त्यातच थकीत कर्जावरील चार महिन्यांचे व्याज शासनाने आम्हाला दिलेले नसल्याने ते भरल्याशिवाय कर्जखाते एनपीएबाहेर येणार नाही, अशा सूचना विविध कार्यकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. 

जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफी व नियमित कर्जदारांना सवलतीसंबंधी ३६९ कोटी रुपये निधी प्राप्त होऊन जवळपास २० ते २२ दिवस झाले. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात है पेसे जमा झालेले नाहीत. कर्जखाते अजूनही एनपीएमध्येच आहेत. त्यातच थकीत कर्जावरील चार महिन्यांचे व्याज शासनाने आम्हाला दिलेले नसल्याने ते भरल्याशिवाय कर्जखाते एनपीएबाहेर येणार नाही, अशा सूचना विविध कार्यकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. 

तसेच नियमीत कर्जदारांनाही त्यांच्या सवलतीची रक्कम अजूनही त्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. जिल्ह्यात सुमारे ३६९ कोटी रुपये जिल्हा बॅंकेला प्राप्त झाले आहेत. त्यात पुनर्गठित कर्जदारांच्या यादीचा घोळ अजूनही कायम आहे.  तसेच चार महिन्यांचे व्याज शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात भरण्यासाठी दिलेले नाही. हे व्याज मिळाले नाही, तर सोसायट्या पर्यायाने जिल्हा बॅंकेचे नुकसान होईल. ते प्राप्त झाल्याशिवाय कर्जखाते एनपीएबाहेर येणार नाही, अशी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

पुनर्गठित कर्जाबाबत लेखापरीक्षण पूर्ण
जिल्ह्यात पुनर्गठित कर्जदारांची माहिती शासनाकडे पाठविलेली नव्हती. त्याची यादी नंतर जिल्हा बॅंकेकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्राप्त करून घेतली. त्यासंबंधी जिल्हा विशेष लेखा विभागाने लेखापरीक्षण केले. सोसायटीकडून आलेली यादी व प्रत्यक्ष अर्जदार यासंबंधी माहिती तयार करून लाभार्थ्यांच्या अंतिम यादी शासनाकडे पाठविली. 

रक्कम कर्जखात्यात भरणार
ज्या लाभार्थींची रक्कम शासनाकडून आली आहे त्यांची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये रक्कम कर्जखात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच जिल्हा बॅंकेतही त्यासंबंधीची माहिती मिळवून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...