शाश्‍वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’

कृषी कल्चर
कृषी कल्चर

पुणे ः एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी खात्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.  एक आॅक्टोबरला दिवसभर होणाऱ्या या परिषदेत शाश्वत विकासासाठीच्या आदर्श शेती पद्धती, कौशल्य विकास, स्मार्ट शेती, क्लस्टर डेव्हलपमेंट, समूह शेती, गटशेती, शेती क्षेत्रातील नवीन प्रवाह, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण गोष्टी आदी अनेक बाबींवर विचारमंथन होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रातील नवउद्यमीही (स्टार्ट अप) या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेला जोडूनच एक कृषी प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये बियाणे, खते, कृषी अवजारे उत्पादक कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. स्टार्ट अप उद्योजकांना या परिषदेच्या माध्यमातून संभाव्य गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याचीही संधी मिळणार आहे.  या परिषदेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना शाश्वत कृषी विकास आणि समूह पद्धतीने सर्वांगीण ग्रामीण विकास यांचे मार्गदर्शन आणि कौशल्यविकसन हा आहे. या परिषदेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच शेतकऱ्यांना छोट्या समूहांमध्ये प्रत्यक्ष तज्ज्ञांशी चर्चा करून समस्यांवर उत्तरे शोधण्याची संधी प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानशी संबंधित असणाऱ्या संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधनही या प्रसंगी प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.   शेतकऱ्यांना समूहाच्या माध्यमातून एकत्र आणून शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या समूहशक्तीची ताकद जोखत शेतकऱ्यांनी गटशेतीची कास कशी धरावी, कृषी निविष्ठांची सामूहिक खरेदी, शेतीमालाची सामूहिक विक्री, कर्ज-विमा आदींचा लाभ कसा घ्यावा, यासंदर्भात या परिषदेत चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना परिषदेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी खालील फोन नंबर किंवा ई-मेल वर संपर्क साधावाः ०८६६९६८९०१७, info@krishiculture.in. व्यावसायिक सहभागासाठी अंशिका मिश्रा यांच्याशी (९८१९७४९४९८) संपर्क साधावा. परिषदेची सर्व माहिती www.krishiculture.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. कृषी कल्चर परिषदेचे उद्देश

  • शाश्वत शेती आणि सर्वांगीण सामूहिक ग्रामविकासाची वाट चोखाळणे
  • शेतकऱ्यांना आदर्श शेतीपद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाच ओळख करून देणे
  • स्मार्ट शेतकरी बनण्याकडे वाटचाल. समूहशक्तीचा जागर करून गटशेतीची कास धरणे
  • मार्केट लिंकेजेस विकसित करण्याची गुरुकिल्ली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com