agriculture news in Marathi, Agri department ask for help for pink bowl worm, Maharashtra | Agrowon

वस्त्रोद्योग विभागाकडे बोंड अळीच्या प्रतिकारासाठी मागितली मदत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे : खरिपाच्या पुढील हंगामातदेखील गुलाबी बोंड अळीचे संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बोंड अळी रोखण्याच्या कामात जिनिंग उद्योगाला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्याच्या वस्त्रोद्योग संचालकांसमोर ठेवला आहे.

पुणे : खरिपाच्या पुढील हंगामातदेखील गुलाबी बोंड अळीचे संकट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बोंड अळी रोखण्याच्या कामात जिनिंग उद्योगाला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्याच्या वस्त्रोद्योग संचालकांसमोर ठेवला आहे.

गुलाबी बोंड अळीने राज्यातील ३२ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे यंदा नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, कंपन्यांवर कारवाई, विधिमंडळात विरोधकांचा भडिमार अशा विविध समस्या केवळ बोंड अळीमुळे राज्य सरकारसमोर तयार झालेल्या आहेत. पुढील हंगामातदेखील राज्यात बोंड अळीची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे शासनाकडून प्रतिबंधकात्मक उपाय आतापासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

‘‘पुढील हंगामात गुलाबी बोंड अळी रोखायची असल्यास कापूससाठा असलेल्या जागांपासूनच व्यवस्थापन सुरू करावे लागेल. या कामासाठी राज्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग उद्योगाची मदत अत्यावश्यक आहे. त्याशिवाय बोंड अळीला रोखता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कृषी आयुक्तांनी स्वतः राज्याच्या वस्त्रोद्योग संचालकांशी संपर्क साधून मदत मागितली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 
‘‘राज्यातील जिनिंग-प्रेसिंग मिल्समध्ये प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे लावावेत व त्यात अडकलेले पतंग नष्ट करण्यासाठी मिल्स उद्योगाला सूचना द्याव्यात,’’ असे कृषी आयुक्तांनी वस्त्रोद्योग संचालकांना तातडीने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

‘‘बोंड अळीची लागण झालेला कापूस मोठ्या प्रमाणात सध्या जिनिंग प्रेसिंग मिल्सकडे जात आहे. तेथे कामगंध सापळे लावून नर पतंग नष्ट केल्यास बोंड अळीची उत्पत्ती थांबू शकेल. त्यामुळे या उपाययोजना राबविण्यासाठी जिनिंग उद्योगाला सूचना द्याव्यात. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त काम करावे लागेल. या कामाचे वस्त्रोद्योग विभागानेदेखील संनियंत्रण करावे,’’ असेही आयुक्तांनी वस्त्रोद्योग संचालकांना सुचविले आहे. 

वस्त्रोद्योग विभागाला सुचविलेले उपाय

  • राज्यातील जिनिंग प्रेसिंग मिल्सकडून जानेवारीपासून ते हंगाम संपेपर्यंत ५० ते १०० पर्यंत कामगंध सापळे लावावेत
  • जिनिंग मिलच्या परिसरात ५ ते १५ प्रकाश सापळे लावून नर व मादी आकर्षित करून नायनाट करावा 
  • या कामासाठी जिनिंग मिलवर एका कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देऊन सापळ्यांबाबत जबाबदारी सोपवावी. 
  • हंगाम संपेपर्यंत परिसर स्वच्छ ठेवून तुटलेल्या कापूस बिया व कापूस कचरा नष्ट करावा
  • कापसाची साठवण जास्त दिवस करू नये. यामुळे पुढील हंगामात बोंड अळी रोखण्यास मदत होऊ शकते.
  • कामगंध सापळे लावण्यासाठी पेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाची मदत घ्यावी.

इतर बातम्या
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...