कृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकेच्या पडताळणीचेही काम!

कृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकेच्या पडताळणीचेही काम!

अकोला : कृषी विभागात अाधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्यांना योजनांचा गाडा अोढावा लागत अाहे. यात त्यांची दमछाक होत असल्याच्या वारंवार तक्रारी पुढे येतात. अाता अशा परिस्थितीतही अाता अकोला जिल्ह्यात कृषी कर्मचाऱ्यांकडे शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे काम देण्यात अाले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत असून अापल्या मूळ कामांवर परिणाम होण्याची शक्यता ते व्यक्त करीत अाहेत.   राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय, एपीएल या योजनांतर्गत शेतकरी लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचे अादेश अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अाहेत. त्यानुसार ग्रामीण भागात स्वस्त धान्य  शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे काम या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जाणार अाहे. हे काम करण्याची जबाबदारी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर देण्यात अाली असून, या  कर्मचाऱ्यांनी रविवार (ता. २६)पर्यंत ते पूर्ण करून द्यायचे अाहे. या अादेशाचे पालन करण्यात कसूर केल्यास सेवा अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला अाहे. या पडताळणीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत तोडगा काढण्याची मागणी केली. त्यांनी वरिष्ठांकडे याबाबत सल्ला मागितला अाहे. सध्या गुलाबी बोंडअळीचा ज्वलंत विषय सुरू अाहे. त्याचबरोबर ठिबक-तुषार संच तपासणी, जलयुक्त शिवार योजना व इतर नियमित योजनांची कामे करतानाही शिधापत्रिका तपासणीचे अादेश अाले अाहेत. त्यामुळे दोन्ही कामे एकाचवेळी करणे शक्य नाही. असे करीत असताना खात्याच्या कामावर विपरीत परिणाम झाल्यास त्यासाठी कृषी सहायकाला जबाबदार धरण्यात येऊ नये. - अनंत देशमुख, कोषाध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com