agriculture news in marathi, Agri department files complaint against six BT companies | Agrowon

बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा कंपन्यांविरुद्ध तक्रार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने याप्रकरणी जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पुरेशे कागदपत्र, प्रयोगशाळेचे अहवाल व प्रकरणाशी संबंधित माहिती पोलिसांनी कृषी खात्याला सादर करण्यास सांगितली अाहे.  

अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने याप्रकरणी जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पुरेशे कागदपत्र, प्रयोगशाळेचे अहवाल व प्रकरणाशी संबंधित माहिती पोलिसांनी कृषी खात्याला सादर करण्यास सांगितली अाहे.  

जिल्ह्यात बोंड अळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या जवळपास ११०० तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या अाहेत. या तक्रारींवर केवळ रँडम पद्धतीने तपासणीचे काम कृषी विभाग करीत अाहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता शिवसेनेने नुकतेच (ता. २२) अाक्रमक होत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या अांदोलन केले. यानंतर जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक जंजाळ व शिवसेना कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून सहा बीटी कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली. ही तक्रार पोलिसांनी दाखल केली. मात्र याप्रकरणी कारवाईसाठी अाणखी माहिती सादर करण्याबाबत कृषी विभागाला सांगितले अाहे. त्यानंतर गुन्हे दाखल करण्याबाबत पुढील प्रक्रिया केली जाणार अाहे. 

बीटी कपाशी बीजी-२ उत्पादक कंपन्यांनी संबंधित बियाणे अधिकृत विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना विक्री करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याने  महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ चे उल्लंघन झाले आहे. त्यानुषंगाने संबंधित सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार प्रशासनाच्या वतीने जंजाळ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

पंचनाम्यात दिसून अाले होते तथ्य
जिल्ह्यात या खरीप हंगामात पेरणी केलेल्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने, पिकांचे नुकसान झाल्याच्या तालुकास्तरावर एक हजार ९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तालुकास्तरीय बीज निरीक्षकाने त्यापैकी २९६ तक्रारींची क्षेत्र पाहणी केली अाहे. प्राथमिक तपासणी अहवालानुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. बीटी कपाशी बीजी २ वाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होणे अपेक्षित नसताना, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...