agriculture news in Marathi, Agri department not have answer on companies questions, Maharashtra | Agrowon

कंपन्यांच्या प्रश्‍नांनी कृषी विभाग निरुत्तर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नागपूर : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानभरपाईप्रकरणी महासुनावणी सुरू झाली आहे. या दरम्यान काही कंपन्यांनी सुनावणीला आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया वर्षभरातदेखील पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांच्या स्तरावरील भरपाई मिळेल किंवा नाही, याविषयी साशंकता व्यक्‍त होत आहे. 

नागपूर : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानभरपाईप्रकरणी महासुनावणी सुरू झाली आहे. या दरम्यान काही कंपन्यांनी सुनावणीला आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया वर्षभरातदेखील पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांच्या स्तरावरील भरपाई मिळेल किंवा नाही, याविषयी साशंकता व्यक्‍त होत आहे. 

काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पुणे आयुक्‍तालय स्तरावर झालेल्या सुनावणीला मंगळवारी (ता. २३) हजेरी लावली होती. या वेळी संचालक (गुणवत्ता नियंत्रण) यांनी संबंधितांना थेट तुमच्या विरोधात इतक्‍या तक्रारी आहेत, त्यापोटी इतकी भरपाई देय असल्याचे सांगितले. त्यावर तुमचे म्हणणे मांडा असे सांगण्यात आले. 

या वेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कोणत्या लॉट नंबरच्या बियाण्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाला, तक्रारकर्ता शेतकऱ्याचे नाव, गाव, त्याने खरेदी केलेले वाण आणि कोणत्या दुकानातून खरेदी केले, अशी कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. अशा प्रकारची कोणतीच माहिती नसताना सरसकट भरपाई कशी देणार, असा सवाल कंपन्यांकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर गुणवत्ता नियंत्रण संचालकांनादेखील आपली चूक उमगल्याने त्यांनी अशी माहिती लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार नव्याने देण्यात आलेल्या नोटिशीवर शेतकऱ्यांचे नाव, गाव, लागवड क्षेत्र, भरपाई म्हणून कंपन्यांना देय असणारी रक्‍कम, कंपन्याचे वाण अशी माहिती नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख ३१ जानेवारी अशी निश्‍चित करण्यात आली आहे. 

नुसती बोंड अळी आली असे सांगत नुकसानभरपाई मागणाऱ्या कृषी विभागाकडे बीटी कापूस झाड तपासणी कोणत्या प्रयोगशाळेत केली, असा प्रश्‍न कंपन्यांनी उपस्थित केला आहे. तांत्रिक मुद्द्यांवर बोट ठेवत कृषी विभागाची कोंडी करण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात आहे. त्यामध्ये पंचनाम्यांवर कंपनी प्रतिनिधीची सही आहे का, हा मुद्दादेखील यापुढील काळात मांडला जाणार आहे.

याउपरही सरकारने नुकसानभरपाईसाठी सक्‍ती केली, तर करारानाम्यातील तरतुदीप्रमाणे मोन्सॅंटो आणि बियाणे कंपन्या ५० टक्‍के नुकसानीस पात्र राहतील. मात्र या नुकसानभरपाईसदेखील कंपन्या तयार नसल्याचे वृत्त असून, न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या...
खरीप आढावा बैठका जिल्हाधिकारी घेणारपुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप...
कृषिसेवक भरतीला न्यायाधीकरणाची मनाईपुणे : कृषिसेवक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या...
लिंबावर काळ्या माशीचा प्रादुर्भावअकोला: लिंबू बागांमध्ये सध्या आंबिया बहर...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी...बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभपुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम,...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...