agriculture news in marathi, agri department peon makes 12 lakh 64 thousand fraud | Agrowon

कृषी कार्यालयाच्या शिपायाने घातला साडेबारा लाखांना गंडा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

बुलडाणा : कृषी खात्यात कार्यरत असलेल्या एका शिपायाने खोटी कागदपत्रे तसेच स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्याच्या नावे सुमारे १२ लाख ६४ हजारांचे धनादेश वटवित अपहार केल्याचे गंभीर प्रकरण समोर अाले अाहे. यामुळे बुलडाणा कृषी विभागात एकच खळबळ उडालेली अाहे. जळगाव जामोद तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेल्या प्रकाश राठोड नावाच्या शिपायाविरुद्ध या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली अाहे.  बुधवार (ता. २८)पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात अाली अाहे.

बुलडाणा : कृषी खात्यात कार्यरत असलेल्या एका शिपायाने खोटी कागदपत्रे तसेच स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्याच्या नावे सुमारे १२ लाख ६४ हजारांचे धनादेश वटवित अपहार केल्याचे गंभीर प्रकरण समोर अाले अाहे. यामुळे बुलडाणा कृषी विभागात एकच खळबळ उडालेली अाहे. जळगाव जामोद तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेल्या प्रकाश राठोड नावाच्या शिपायाविरुद्ध या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली अाहे.  बुधवार (ता. २८)पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात अाली अाहे.

जळगाव जामोद तालुका कृषी कार्यालयात प्रकाश राठोड हा एकमेव शिपाई कार्यरत असून, तोच सर्व कामे सांभाळत होता. त्याने कृषी कार्यालयातून धनादेश चोरले व बॅंकेत वटवून त्याद्वारे १२ लाख ६४ हजार रुपये काढले अाहे. ही रक्कम काढण्यासाठी शिपायाने सुमारे १२७ वेळा एटीएमचा वापर केला अाहे.  बनावट कागदपत्रे, खोट्या स्वाक्षऱ्या करून अशा प्रकारची फसवेगिरी केली जात असताना बॅंक अधिकाऱ्यांच्या कुठेही लक्षात न येण्याबाबत अाश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले अाहे. 

राठोड याने या कार्यालयातून २१६८९ व २१६९५० या क्रमांकांच्या धनादेशाचा वापर केला. या धनादेशाद्वारे सुमारे १२ लाख ६४ हजार रुपये रक्कम जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथील शेतकरी समाधान तोताराम काळंगे यांच्या खात्यात जमा केली. एटीएमद्वारे ही रक्कम टप्प्याटप्‍याने काढली. या शेतकऱ्याने जेव्हा अापल्या बँक पासबुकवर एंट्री घेतल्या त्या वेळी त्यांना या रकमांची उलाढाल पाहून अाश्चर्य वाटले. त्यांनी बँकेकडे चौकशी केली. नंतर संबंधित बॅंकेने ही बाब तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली असता, नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये दोन धनादेशांवर अापल्या बोगस स्वाक्षऱ्या असल्याचे समजले. त्यामळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ जळगाव जामोद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. 

बॅंकेच्या व्यवहारांबाबत अाश्चर्य 
सामान्य शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणे, त्यातून टप्प्याटप्प्याने विड्रॉल होणे, यासाठी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे कुठेही लक्षात न येणे, याबाबत अाता अाश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले अाहे. योजनांचे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बँक खात्याच्या तपशिलासह अाधार, मोबाईल क्रमांक व इतर माहिती देतात. याच माहितीचा राठोड याने गैरफायदा उचलला. शेतकऱ्याच्या नावाने एटीएम कार्ड बँकेकडून बनवून घेतले. अापल्या वरिष्ठांची खोटी स्वाक्षरी करीत खात्यात धनादेश वटविले व नंतर ही रक्कम एटीएममधून काढली. हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून, पोलिसांनी मुळापर्यंत तपास करण्याची गरज अाहे. शिपायाने काढलेली रक्कम ही एका सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला देण्यासाठी कृषी विभागाच्या खात्यात जमा झाली होती, असे समोर अाले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...