agriculture news in marathi, Agri department schedules campaign with private companies to control bollworm | Agrowon

बोंड अळी प्रतिकारासाठी कंपन्यांकडून जिल्हानिहाय मोहिमा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने बियाणे उत्पादक कंपन्यांच्या मदतीने मोहिमा उघडल्या आहेत. मोहीम प्रभावी होण्यासाठी कंपनीनिहाय जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत. 

पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने बियाणे उत्पादक कंपन्यांच्या मदतीने मोहिमा उघडल्या आहेत. मोहीम प्रभावी होण्यासाठी कंपनीनिहाय जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत. 

राज्यात गेल्या हंगामात ४२ लाख हेक्टरपैकी ३२ लाख हेक्टरवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. पुढील हंगामात ही समस्या टाळण्यासाठी जिल्हानिहाय मोहीम सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्याप एकाही शेतकऱ्याला शासनाने घोषित केलेली प्रतिहेक्टरी ३० हजार रुपयांची भरपाई मिळालेली नाही. 

"नुकसानभरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्जांवर कृषी विभागाकडून महासुनावणी सुरू झाली आहे. भरपाई केव्हा मिळेल याची खात्री कृषी विभागाला देता येणार नाही. मात्र, पुढील वर्षी बोंड अळी पुन्हा हल्ला करू नये यासाठी मोहीम राबविण्याची संधी आमच्या हाती आहे. त्यासाठीच बियाणे उत्पादक कंपन्यांना जिल्हे वाटून मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

बियाणे उत्पादक कंपनीने संबंधित जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या समन्वयातून मोहिमा सुरू कराव्यात, अशा सूचना काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोहिमा सुरू झाल्या असून, त्यात कृषी विभागाचे कर्मचारी, शास्त्रज्ञ, जिनर्स, बियाणे विक्रेत्यांचा समावेश आहे. बोंड अळीने ग्रासलेली हजारो गावे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मात्र, मनुष्यबळाची मर्यादा बघता सध्या तरी निवडक गावांमध्येच या मोहिमा राबविल्या जात आहेत, असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले.  

राज्याचे प्रभारी गुणनियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप तसेच सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. वानखेडे यांच्याकडून या मोहिमांचा आढावा घेतला जात आहे. "कृषी खात्याने तयार केलेल्या जिल्हानिहाय नियोजनाप्रमाणे बियाणे कंपन्यांकडून बोंड अळीच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुढील हंगामात बोंड अळीला रोखण्यासाठी शेतातील रोगग्रस्त पीक काढून टाकणेच हेच सर्वांत मोठे आव्हान सध्या आहे. त्यासाठी शासनपातळीवरून जागृती झाल्यास बोंड अळीविरोधातील लढा यशस्वी ठरू शकतो, असे डॉ. वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.  

 बियाणे उत्पादक कंपनीचे नाव  व्यवस्थापनासाठी दिलेला जिल्हा
 महिको सीडस्  परभणी, नांदेड
 अजित सीडस्  बीड, अकोला, धुळे
 राशी सीडस्  जळगाव, अमरावती, यवतमाळ
 कावेरी सीडस्  नगर, बुलडाणा
 अंकुर सीडस्   नागपूर, वर्धा, चंद्रपूर
 नुजिविडू सीडस्   बीड, उस्मानाबाद, नंदूरबार
 ग्रीनगोल्ड   औरंगाबाद, जालना
 नाथ सीडस्    जळगाव
 कृषिधन    हिंगोली, वाशीम

मोहिमांची वैशिष्ट्ये

  • कृषी विभाग व बियाणे उत्पादक कंपन्यांच्या संघटनेचा संयुक्त उपक्रम 
  • बियाणे उत्पादक कंपन्यांकडून कीड रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैठका
  • जिनिंग व प्रेसिंग युनिटमध्ये प्रकाश सापळे, कामगंध सापळ्यांचे वाटप
  • काही कंपन्यांकडून फिरत्या व्हॅनद्वारे गावागावांमध्ये बोंड अळीविरुद्ध जागृती
  • शेतातील रोगग्रस्त पीक काढून टाकण्यासाठी गावात बैठका 
  • बोंड अळीग्रस्त गावांची निवड करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याची मदत

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...