agriculture news in marathi, agri education will be upgrated with the help of Thailand | Agrowon

थायलंड देणार भारतातल्या कृषी शिक्षणाला व्यावसायिक शेतीची जोड
ज्ञानेश्र्वर रायते
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

बारामती, जि. पुणे : अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचालित कृषी महाविद्यालयाने शेतीच्या अाधुनिक शिक्षणातील पुढचा टप्पा गाठताना नेदरलॅंडनंतर आता थायलंडशीही कृषी शिक्षणाबाबत करार केला आहे. भारतातील शेती शिक्षणाला थायलंडमधील व्यावसायिक शेतीची जोड देणारा हा भारतातील पहिलाच अभ्यासक्रम ठरला आहे. 

बारामती, जि. पुणे : अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचालित कृषी महाविद्यालयाने शेतीच्या अाधुनिक शिक्षणातील पुढचा टप्पा गाठताना नेदरलॅंडनंतर आता थायलंडशीही कृषी शिक्षणाबाबत करार केला आहे. भारतातील शेती शिक्षणाला थायलंडमधील व्यावसायिक शेतीची जोड देणारा हा भारतातील पहिलाच अभ्यासक्रम ठरला आहे. 

राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बॅंकॉक येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व कृषी महाविद्यालयामध्ये याचा औपचारिक करार २ नोव्हेंबर २०१७ ला करण्यात आला. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, बॅंकाक येथील इन्स्टिट्यूटचे पीयूष सोनी व राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, तर या करारावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग 
फुंडकर यांनी शिक्कामोर्तब केले. 

या झालेल्या करारानुसार असलेल्या अभ्यासक्रमात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवी अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी हे बीएस्सी अॅग्रीच्या पदवीच्या शेवटच्या हंगामातील आठवे सत्र हे बॅंकॉक येथे जाऊन शिकतील. तेथे तब्बल २० आठवड्यांच्या कालावधीत तेथील हरितगृहातील उच्च तंत्रज्ञान, मातीविना शेती, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, भाजीपाला तसेच फळबाग तंत्रज्ञान शिकतील. त्याचा उपयोग भविष्यात भारतातील शेतीतील अडचणींवर मात करण्यासाठी व शेतीच्या शाश्वत विकासासाठी होईल.

थायलंडमधील हा कृषी अभ्यासक्रम भारतातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने बारामतीच्या कृषी महाविद्यालयाने राहुरी विद्यापीठाने वेळोवेळी आयोजित केलेल्या कृषी अभ्यास मंडळ व कृषी विद्या शाखांच्या बैठकीत प्रात्यक्षिक सादरीकरण केले व कृषी क्षेत्रातील तेथील अनुभवात्मक प्रात्यक्षिके किती महत्त्वाची आहेत हे पटवून देत शिक्षण अभ्यासक्रमासाठी मंजुरी मिळवली.

हा सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, कृषी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक नीलेश नलावडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक श्रीमंत रणपिसे, कृषी महाविद्यालय बारामतीच्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख मच्छिंद्र आगळे व प्राध्यापक गणेश शिंदे यांनी प्रयत्न केले. असा अभ्यासक्रम राबविणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे देशातील पहिले विद्यापीठ, तर बारामती हे पहिले कृषी महाविद्यालय आहे.
 

फोटो गॅलरी

इतर बातम्या
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
शेतरस्ते, शाळांच्या कुंपणासाठी निधीची...जळगाव : शेतरस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या...
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
उपलब्ध साधनांना मूल्यवर्धनाची जोड द्या...औरंगाबाद : महिला बचत गटांनी उद्योगनिर्मिती व...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
ज्वार संशोधन केंद्रास आयसीएआर...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
खेड, हवेलीत मागणीनुसार टॅंकर सुरू करावेतपुणे : खेड आणि हवेली तालुक्‍यातील पाणी आणि...
अकोल्यासाठी २२० कोटींचा प्रारूप आराखडा...अकोला : यंदाच्या २०१९-२० वर्षासाठी जिल्हा नियोजन...
खासदार खैरेंनी जनतेची खैरच ठेवली नाही ः...कन्नड, जि. औरंगाबाद ः ‘‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार...