agriculture news in marathi, agri equipment distribution, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांना ५४ अवजारांचे वाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018
मजूर समस्येवर मात करण्यासाठी भात उत्पादकांना विविध अवजारे दिली आहेत. येत्या खरिपात या अवजारांचा वापर होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात मजूरटंचाईवर मात करणे शक्‍य होईल. चालू वर्षातही भात उत्पादकांना अवजारांचे वाटप करण्यात येईल.
- चंद्रकांत भोर, उपविभागीय कृषी अधिकारी, पुणे.
पुणे  ः दरवर्षी शेतकऱ्यांना भात पिकाची लागवड ते मळणी करण्यासाठी मनुष्यबळाची मोठी कमतरता भासते. त्यावर मात करण्यासाठी भात उत्पादकांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढत आहे. यंदा कृषी विभागाच्या माध्यमातून भात पट्यातील शेतकऱ्यांनी ५४ अवजारांची खरेदी केली आहे. येत्या खरीप हंगामापासून हे शेतकरी यांत्रिकीकरणावर भर देणार असल्याचे चित्र आहे. 
 
जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके भात पिकासाठी ओळखले जातात. या भागातील शेतकरी दरवर्षी जून ते जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भात लागवड करतात. त्या वेळी मनुष्यबळाची मोठी अडचण भासते. त्यामुळे भात लागवडीस उशीर होतो. त्याचा परिणाम उत्पादन आणि उत्पन्नावर होतो. त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी भात उत्पादक यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. 
 
जिल्ह्यात भाताचे जवळपास ६४ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० हजार हेक्‍टरवर भात लागवड होते. परंतु लागवड ते काढणीवेळी भात उत्पादकांना मजुरांची मोठी समस्या भासते. ही समस्या कमी करण्याचे कृषी विभागाने ठरविले आहे.
 
यंदा कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लागवडीसाठी भात लावणी यंत्र, भात कापणीसाठी कापणी यंत्र आणि रिपर, रिपर कम बाईंडर तसेच मळणीसाठी भात मळणी यंत्रे भात उत्पादकांना देण्याचे ठरविले आहे. त्यास भात उत्पादकांनी चांगला प्रतिसाद दिला असून कृषी विभागाच्या माध्यमातून ३१ लाख ९१ हजार २४६ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.  

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...