agriculture news in marathi, agri equipments purchasing status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस शेतकऱ्यांनी खरेदी केली अवजारे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018
सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार २७ शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या अवजारांसाठी १५ कोटी ४३ लाख ५५ हजार ३३३ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
 
सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार २७ शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या अवजारांसाठी १५ कोटी ४३ लाख ५५ हजार ३३३ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
 
शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर टंचाई भासत असल्याने तसेच पीक उत्पादन वाढीसाठी शासनाकडून यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला होता. या यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. या मोहिमेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
 
जिल्ह्यातील ११ हजार १७३ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. निधीच्या तुलनेत जास्त अर्ज आल्याने लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची नावे काढून पहिल्या सात हजार १७६ शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून टप्प्याटप्प्याने पूर्वसंमती देण्यात आली होती. यातील मार्चअखेर दोन हजार २७ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अवजारे खरेदी केल्याने त्यांना अनुदान म्हणून १५ कोटी ४३ लाख ५५ हजार ३३३ रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. 
 
या योजनेत सर्वाधिक ५३६ शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर खरेदी केलेली आहे. त्यानंतर ५०१ शेतकऱ्यांनी पॉवर टिलरची तर ९०४ शेतकऱ्यांनी इतर अवजारे खरेदी केली आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून ७६ शेतकऱ्यांना अवजारे देण्यात आली आहेत.
 
मुदतीत खरेदीत झालेल्या अवजारे व ट्रॅक्‍टरची कृषी विभागाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोका तपासणी केली जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जात असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...