agriculture news in marathi, Agri exhibition starts in Kopargaon, ahmednagar | Agrowon

कृषी प्रदर्शन आधुनिक शेतीची वाट दाखविणारे ठरेल
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

कोपरगाव, जि. नगर ः शेतीच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कर्मवीर कै. शंकरराव काळे यांनी आयुष्य वेचले आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आणि तरुण पिढीला आधुनिक शेतीची वाट दाखविण्यास कारणीभूत ठरेल, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव, जि. नगर ः शेतीच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कर्मवीर कै. शंकरराव काळे यांनी आयुष्य वेचले आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आणि तरुण पिढीला आधुनिक शेतीची वाट दाखविण्यास कारणीभूत ठरेल, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.

माजी खासदार कै. शंकरराव काळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, पंचायत समितीच्या सभापती अनसूया होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. काळे म्हणाले, की शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची शाश्‍वत व्यवस्था नसल्याने शेती तोट्यात जाते. शेती करणाऱ्या तरुण पिढीचा भ्रमनिरास होतो आहे. तरीही नव्या संशोधनाच्या आधारे तयार करण्यात आलेली औजारे, नव्या लागवड पद्धती, सौर उपकरणे, नवी यंत्रे, बियाणे व औषधे, नव्या जातींची बियाणे व नवे तंत्रज्ञान यांचा आधार घेऊन कमीत कमी श्रमात व कमी खर्चात आधुनिक शेती करणे शक्‍य आहे. कृषी प्रदर्शन भरविण्याचा हेतू हाच आहे. 

या प्रदर्शनात शंभराहून अधिक नामांकीत कंपन्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांसमोर आधुनिक शेतीचा रोड मॅप उभा केला. त्यांना अल्पदरात या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी आम्ही दिली.
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...