agriculture news in marathi, agri expo planning not fix in akola, maharashtra | Agrowon

अकोल्यातील कृषी महोत्सवास मुहूर्त मिळेना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 मार्च 2018
अकोला : राज्यभर कृषी विभागातर्फे महोत्सव सुरू असताना अकोल्यातील कृषी महोत्सवाबाबत अद्यापही तारीख निश्‍चित झालेली नाही. आजवर विविध तांत्रिक अडचणींमुळे हा महोत्सव रेंगाळत चाललेला आहे.
 
अकोला : राज्यभर कृषी विभागातर्फे महोत्सव सुरू असताना अकोल्यातील कृषी महोत्सवाबाबत अद्यापही तारीख निश्‍चित झालेली नाही. आजवर विविध तांत्रिक अडचणींमुळे हा महोत्सव रेंगाळत चाललेला आहे.
 
शासनाने शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्र माहिती व्हावे, गटांना आपल्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी सुविधा मिळावी यासह विविध हेतू ठेवून जिल्हा कृषी महोत्सव घेण्याची घोषणा केली. यासाठी २० लाखांची विशेष तरतूदही प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आली आहे. राज्यात अर्ध्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव झाले आहेत. वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यामध्येही गेल्या महिन्यात कृषी महोत्सव झाले. मात्र अकोल्यातील कृषी महोत्सवाची तारीख अद्यापही निश्‍चित झालेली नाही. 
 
बैठकांवर बैठका सुरू आहेत. महोत्सव आयोजनासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया करण्यात आली. परंतु अद्याप तारीख निश्‍चित होऊ शकलेली नाही. मार्च महिना अर्धा संपला असून या भागात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यापुढील दिवस आणखी तीव्र उष्णतेचे राहतील. अशास्थितीत कृषी महोत्सवाला विलंब होणे हे अधिक गैरसोयीचे ठरणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून अकोल्यात ‘वावर’ धान्य महोत्सव प्रसिद्ध झालेला आहे. हा धान्य महोत्सव आजवर चांगला व शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरलेला आहे. धान्य महोत्सवाला दरवर्षी मोठी गर्दी होत असून प्रतिसादही चांगला मिळत होता. यावर्षी कृषी महोत्सव घेतला जाणार असल्याने धान्य महोत्सव गुंडाळला जाणार हे निश्‍चित मानले जाते.

इतर जिल्ह्यातील कृषी महोत्सवांचा अनुभव पाहता काही अपवाद वगळता कृषी महोत्सव हा ‘उत्सव सोहळा’च अधिक बनलेला दिसून आला आहे. अशास्थितीत आता अकोल्यातील कृषी महोत्सवात नेमके काय बदल व सुधारणा केल्या जातात हे येत्या काळात स्पष्ट होईल.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...