agriculture news in marathi, agri expo starts, nagar, maharashtra | Agrowon

शेतकरी विकासासाठी कृषी महोत्सव फायदेशीर ः प्रा. शिंदे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018
नगर  ः तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विकासासाठी काम केले आहे. सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहोत. शेतकरी ते ग्राहक चळवळीला प्राधान्य दिले जात आहे. मध्यस्थी बंद करण्यासाठी कायदा केला आहे. कृषी महोत्सव शेती आणि शेतकरी विकासासाठी फायदेशीर ठरत आहे, असे मत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. 
 
नगर  ः तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विकासासाठी काम केले आहे. सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहोत. शेतकरी ते ग्राहक चळवळीला प्राधान्य दिले जात आहे. मध्यस्थी बंद करण्यासाठी कायदा केला आहे. कृषी महोत्सव शेती आणि शेतकरी विकासासाठी फायदेशीर ठरत आहे, असे मत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. 
 
नगर येथे शुक्रवारपासून (ता. ३०) कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे सुरू झालेल्या कृषी महोत्सवाचे प्रा. शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, विभागीय कृषी संचालक विजयकुमार इंगळे, महापौर सुरेखा कदम, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, डॉ. किरण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, युवराज शेळके, कृषी विकास अधिकारी सुनील राठी या वेळी उपस्थित होते.
 
प्रा. शिंदे म्हणाले, की शेतकरी आता नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती करीत आहेत. त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे प्रोत्साहन मिळत असून, तीन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान दिले आहे. वेगवेगळ्या योजनांचा लाभ देत कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले आहे. अधिकाऱ्यांनी मनावर घेतले, तर चांगला विकास साधता येतो, हे सातत्याने सिद्ध झाले आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून शेतीमालाचा चांगला दर्जा सांभाळण्याची गरज आहे. मध्यस्थांची साखळी संपवण्यासाठी सरकारने कायदा केला असून, शेतकरी ते ग्राहक मोहिमेला प्राधान्य दिले जात आहे. जमीन आरोग्य पत्रिकाबाबत मात्र नाराजी व्यक्त करताना कृषी अधिकाऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. ते करावे, असे पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले. 
 
कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे सुरू झालेल्या कृषी महोत्सवात प्रा. शिंदे यांच्यासह अन्य लोकांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचे कौतुक केले. जिल्ह्यामध्ये पूर्वी हजारावर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. आता मात्र अजूनही टॅंकर लागले नाही. ही किमया केवळ जलयुक्त शिवार अभियानामुळे झाली. अजूनही सुरू असलेल्या कामात लोकांनी योगदान देण्याचे प्रा. राम शिंदे यांनी आवाहन केले. 
 
या वेळी राहिबाई सोमा पोपरे (कोंभाळणे, ता. अकोले), दिलीप दत्तात्रेय शिंदे (जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव), मदन भाऊसाहेब चौधरी (खंडाळा, श्रीरामपूर), तुकाराम काशीनाथ गुंजाळ (निमगावजाळी, ता. संगमनेर), भैरवनाथ सेंद्रिय शेती गट (भैरवनाथ नगर, श्रीरामपूर), ओम साईनाथ पशुपालन व दुग्ध उत्पादन गट (मु. कोल्हेवाडी, ता. संगमनेर), बळिराजा शेतकरी गट (पळवे, ता. पारनेर) आणि जय श्रीराम शेतकरी गट (राघोहिवरे, ता. पाथर्डी) यांचा कृषी विभागातर्फे गौरव करण्यात आला. भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रस्ताविक केले. रियाज पठाण यांनी सूत्रसंचालन केले. 
 

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...