agriculture news in marathi, Agri fair starts from today in khamgaon | Agrowon

खामगावमध्ये कृषी महोत्सवाला अाजपासून सुरवात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठा कृषी महोत्सव शुक्रवार (ता. १६) पासून खामगाव येथे सुरू होत अाहे. या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली अाहे. शनिवारी (ता. १७) या महोत्सवाचे उद्‍घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अाहे. कृषी व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या प्रयत्नातून बुलडाणासह पश्चिम विदर्भातील मोठा कृषी महोत्सव कृषी विभागाने अायोजित केला अाहे. 

अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठा कृषी महोत्सव शुक्रवार (ता. १६) पासून खामगाव येथे सुरू होत अाहे. या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली अाहे. शनिवारी (ता. १७) या महोत्सवाचे उद्‍घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अाहे. कृषी व फलोत्पादनमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या प्रयत्नातून बुलडाणासह पश्चिम विदर्भातील मोठा कृषी महोत्सव कृषी विभागाने अायोजित केला अाहे. 

शुक्रवार (ता. १६) ते मंगळवार (ता. २०)पर्यंत जलंब मार्गावरील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर हा कृषी महोत्सव होईल.  या महोत्सवाचा प्रारंभ, प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११.०० वा नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातून ट्रॅक्टर व बैलगाडी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या या दिंडीला कृषिमंत्री श्री. फुंडकर हे हिरवा झेंडा दाखवतील. 
या महोत्सवाचे औपचारिक उद्‍घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार अाहे. या कृषी महोत्सवात ४०० हून अधिक दालने अाहेत.

यामध्ये शेतीविषयी माहिती, तंत्रज्ञान, बी-बियाणे, सेंद्रिय शेती, सौरशेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रिया उद्योग, पशुपालन यांसह अत्याधुनिक शेतीची प्रात्यक्षिके दाखविणारे दालने राहतील. या ठिकाणी शासनाच्या योजनांची माहिती दिली जाणार अाहे. या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांनी भेट देऊन आपल्या शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...