agriculture news in Marathi, agri improvement committee will submit report within two months, Maharashtra | Agrowon

‘कृषी सुधारणा समिती‘ दोन महिन्यांत अहवाल देणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे ः कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांच्या कामकाजातील अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या संस्थांबाबत निर्णय घेण्याबराेबरच इतर संस्थांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्रक्रिया संघाचा अभ्यास करून करावयाच्या उपाययाेजनांची शिफारस दाेन महिन्यांत शासनाला करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

पुणे ः कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांच्या कामकाजातील अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या संस्थांबाबत निर्णय घेण्याबराेबरच इतर संस्थांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्रक्रिया संघाचा अभ्यास करून करावयाच्या उपाययाेजनांची शिफारस दाेन महिन्यांत शासनाला करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

राज्यातील कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम याेजनेअंतर्गत शासन हमीवर अर्थसाह्य करण्यात आले आहे. मात्र काही संस्थांनी शासनाच्या धाेरणात्मक निर्णयाचे उल्लंघन केल्याने अनेक संस्था अार्थिक अडचणीत आल्या तर काही संस्था अवसायनात काढण्यात आल्या. या विविध संस्थांचा अभ्यास करून संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनााला विविध उपाय, शिफारशी समिती करणार आहे. समितीमध्ये काेकण विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्याेती लाटकर, सहसंचालक (प्रक्रिया) बी. एस. जाधव आणि सदस्य सचिवपदी काेल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

समितीने संस्था स्थापनेचा उद्देशाची पूर्तत झाली का, उद्देश साध्य करताना संस्थेला आलेल्या अडीअडचणी, शासकीय अर्थसाह्याचा विनियाेग व झालेली वसुली, संस्थांनी केलेले उल्लेखनीय काम, राेजगारनिर्मिती, संस्थांनी केलेले गैरव्यवहार, गैरव्यवहारांवर केलेली कारवाई, अवसायनात गेलेल्या संस्थाचे पुनरुज्जीवन, गुणात्मक वाढीसाठी करावयाच्या उपाययाेजना आणि शासनाने घ्यावयाचे धाेरणात्मक निर्णय आदी विविध मुद्द्यांवर समिती अहवाल सादर करणार आहे.

इतर बातम्या
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...