agriculture news in marathi, Agri input service centers on strike from 2 to 4 nov, maharashtra | Agrowon

कृषी सेवा केंद्रे २ ते ४ नोव्हेंबरपर्यंत बंद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाकडून तपासणीच्या नावाखाली कारवाईचा बडगा दाखविल्याच्या निषेधार्थ राज्यातील विक्रेत्यांनी २ नोव्हेंबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत संपाचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत राज्यातील सुमारे तीस ते चाळीस हजार कृषी निविष्ठा केंद्रे बंद राहणार आहेत. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टी साइड सीड्‌स डीलर असोसिएशन पुणे(माफदा)च्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर : राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाकडून तपासणीच्या नावाखाली कारवाईचा बडगा दाखविल्याच्या निषेधार्थ राज्यातील विक्रेत्यांनी २ नोव्हेंबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत संपाचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत राज्यातील सुमारे तीस ते चाळीस हजार कृषी निविष्ठा केंद्रे बंद राहणार आहेत. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टी साइड सीड्‌स डीलर असोसिएशन पुणे(माफदा)च्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

कृषी निविष्ठाधारकांचा संप असल्याने तीन दिवस शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ येथे कीटकनाश फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची कडक तपासणी सुरु केली. ही तपासणी करताना अगदी किरकोळ कारणावरूनही या केंद्रावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यामुळे राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते त्रस्त झाले आहेत. या घटनेचा संदर्भ घेऊन केंद्रचालकांना त्रास देण्याचे काम कृषी विभागाकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाला याची तीव्रता कळण्यासाठी या तीन दिवसाच्या संपाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या आहेत संघटनेच्या मागण्या

  • कृषी विक्रेत्यांवरील चुकीचे गुन्हे मागे घेण्यात यावेत
  • निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत
  • ऑनलाइन परवान्यांत समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत. परवान्यामध्ये कीटकनाशकाचे उगम पत्र प्रमाणदाखल करण्याकरिता मुदत देण्यात यावी
  • बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. या निविष्ठा कायद्याच्या कक्षेत येतील याचा विचार व्हावा
  • कृषी विकेत्याकडील कृषी निविष्ठांचा हस्तलिखित साठा रजिस्टरऐवजी संगणकीय पद्धतीने ठेवल्यास तो ग्राह्य धरावा 

यवतमाळच्या पार्श्‍वभूमीवर कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन आम्ही करणार आहोत. या कालावधीत राज्यातील तीस हजारांहून अधिक केंद्रे बंद राहतील. 
-  प्रकाश कवडे, अध्यक्ष,
महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टी साइड सीड्‌स डीलर असोसिएशन, पुणे (माफदा)

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...