agriculture news in marathi, agri inputs association working committee established, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुनील देशमुख
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४ वर्षांनंतर नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून, जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हाध्यक्षपदी अनिल कोचर यांची वर्णी लागली आहे.

बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४ वर्षांनंतर नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून, जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हाध्यक्षपदी अनिल कोचर यांची वर्णी लागली आहे.

शेगाव येथे संघटनेचे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यामध्ये २००५ पासून असलेली कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यानंतर नवीन चेहऱ्यांना संधी देत जिल्हाध्यक्षपदी अनिल कोचर व कार्याध्यक्षपदी सुनील हसनराव देशमुख यांची निवड करण्यात आली. याशिवाय उपाध्यक्षपदी राजेश अग्रवाल, सुरेश फिरके, रुपराव उबाळे, सचिवपदी श्रीकिसन पुरवार, सहसचिवपदी महेश महाजन, कोषाध्यक्षपदी अशोक जैन, कार्यकारी अधिकारीपदी पंकज भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कार्यकारिणीत सदस्य म्हणून प्रभाकर ठाकरे, राजू इतरकर, आशिष मल्लावत, महेश गट्टाणी, बद्रीप्रसाद पडघान, अरुण मोहता, नंदकिशोर पुरोहित, संदीप जाधव, किशोर सुपे, संजय राजगुरू, प्रदीप भुतडा, अशोक देशमुख, देविदास जाधव, विजय भंडारी, सागर भैय्या सहभागी करण्यात आले. या  बैठकीत निवृत्ती पाटील, बिजराज बुरड, रमेश सदाणी, शिवाजीराव पाटील, सुरेश खंडेलवाल, रमेश सावजी, भिष्मसिंह दालमिया, मंगल केशव महाजन, प्रभाकर ठाकरे, भवरसेठ पुरोहित, इंदरसेठ जैन, उदय सोनी, भरत सिसोदिया, डिगंबरअप्पा कुकडे, दत्ताजी पडघान या ज्येष्ठ कृषी विक्रेत्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 

अडचणी सोडविण्यास प्राधान्य ः देशमुख
पदग्रहण केल्यानंतर सुनील देशमुख यांनी नवीन कार्यकारिणीची दिशा स्पष्ट केली. विक्रेत्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यास आपण प्राधान्य देऊ. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याची फसवणूक होणार नाही याची दक्षता आपण विक्रेत्यांनी घेतली पाहिजे, असेही देशमुख यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...