agriculture news in Marathi, agri minister pandurang phundkar says, inspection will be done of BT cotton, Maharashtra | Agrowon

बीटी कपाशीचे पंचनामे करणार : कृषिमंत्री फुंडकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी आल्या असून लवकरच पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा समावेश असलेली समिती पिकांचे पंचनामे करेल, असे ते म्हणाले. 

पुणे : राज्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी आल्या असून लवकरच पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा समावेश असलेली समिती पिकांचे पंचनामे करेल, असे ते म्हणाले. 

बोंडअळीला प्रतिकारक असलेल्या बीटी कापसाच्या वाणांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा राज्यात ४८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून त्यापैकी ४० लाख हेक्टर क्षेत्रावरील बीटी कापसाला गुलाबी बोंड अळीचा फटका बसला असल्याचे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेले पीक नष्ट करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बीटी बियाणे पाकिटावर `पीक गुलाबी बोंडअळीला बळी पडू शकते, तरी पीकव्यवस्थापनाच्या सर्व पद्धतींचा काटेकोर अवलंब करावा` अशा आशयाचा डिस्क्लेमर छापून कायदेशीर कारवाईतून सुटका करून घेण्याची शक्कल लढवली आहे. बोंडअळीला प्रतिकारक असल्याचा दावा करून बीटी बियाण्यांची विक्री केली जात असेल तर असे डिस्क्लेमर छापणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यातून निर्माण होतो.  

बीटी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रार सिद्ध झाली तर शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळू शकते, अशी माहिती कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. कापूस बी-बियाण्यांचा पुरवठा, वितरण व विक्री करणे तसेच त्यांची विक्री किंमत निश्चित करणे याबाबत विनिमय करण्यासाठी अधिनियम २००९`नुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकते. गेल्या वर्षी अशाच स्वरूपाच्या तक्रारीवरून कृषी खात्याने राशी कंपनीचा परवाना रद्द करून शेतकऱ्यांना २६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश काढले, याचा दाखला या अधिकाऱ्याने दिला.  

‘मुख्यमंत्रीच उत्तर देतील‘
किशोर तिवारी यांनी कशाच्या आधारे नुकसानीचा आकडा काढला आहे, असा प्रश्न कृषिमंत्री फुंडकर यांनी उपस्थित केला. तिवारींच्या म्हणण्यानुसार ४० लाख हेक्टरवरील बीटी कापसाचे नुकसान झाले; त्याला आधार काय, असा प्रश्‍न कृषिमंत्र्यांनी केला. तसेच तिवारींनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असेल तर त्याचे उत्तर मुख्यमंत्रीच देतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 
 

इतर अॅग्रो विशेष
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...
कृषी आयुक्तांकडून डाळिंबावरील रोगाचा...सांगली ः राज्यातील आंबे बहारातील डाळिंबावर तेलकट...
केरळात पावसाचा जोर कमी; मदतकार्यात वेगतिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा...
यवतमाळ जिल्ह्यात सोळा कृषी केंद्रांचे...यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे...
पिकं हातची गेली, शिवारात फक्त हिरवा पालापावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या...
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरेसोलापूर  : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'...
खान्‍देशातील तीन प्रकल्प भरलेजळगाव : मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खान्‍...
कापसातील कृत्रिम मंदीचा फुगा फुटलाजळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी...
गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस पुणे : विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड...
‘ग्लायफोसेट’ धोकादायक की सुरक्षित? पुणे: अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या...
अळिंबी उत्पादन, मूल्यवर्धन,...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी...
जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक...
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी...
अस्मानी कहरराज्यात जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा पहिला...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...