agriculture news in marathi, agri officers demotion case in Amravati district | Agrowon

पदोन्नती मिळालेल्या ‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांचे ‘डिमोशन’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला : अमरावती विभागात २०११ मध्ये कृषी सहायकांना दिलेली कृषी पर्यवेक्षक ही पदोन्नती काढून घेतली जाणार असून, या अनुषंगाने मंगळवारी (ता. २२) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात अाली अाहे. 

सन २०११ मध्ये नियमित व तदर्थ पदोन्नती देताना ६५ पेक्षा अधिक अपात्र उमेदवारांना अंतरिम ज्येष्ठता यादीनुसार कृषी सहायकाची पर्यवेक्षक अशी पदोन्नती दिल्या गेल्याचे समोर अाले अाहे. त्यामुळे अाता प्रशासनानेच दिलेली पदोन्नती परत घेण्याची विभागावर नामुष्की अोढवली अाहे.

अकोला : अमरावती विभागात २०११ मध्ये कृषी सहायकांना दिलेली कृषी पर्यवेक्षक ही पदोन्नती काढून घेतली जाणार असून, या अनुषंगाने मंगळवारी (ता. २२) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात अाली अाहे. 

सन २०११ मध्ये नियमित व तदर्थ पदोन्नती देताना ६५ पेक्षा अधिक अपात्र उमेदवारांना अंतरिम ज्येष्ठता यादीनुसार कृषी सहायकाची पर्यवेक्षक अशी पदोन्नती दिल्या गेल्याचे समोर अाले अाहे. त्यामुळे अाता प्रशासनानेच दिलेली पदोन्नती परत घेण्याची विभागावर नामुष्की अोढवली अाहे.

शासनामध्ये अनेकदा बेबंदशाही पहायला मिळते. अमरावती विभागातही असाच प्रकार सन २०११ मध्ये झाला. कृषी खात्यात अमरावती विभागात नियम डावलून अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा प्रकार घडला होता. सुमारे ६५ पेक्षा अधिक जण नियमित, तदर्थ पदोन्नती मिळवून कृषी सहायकांचे  पर्यवेक्षक बनले होते. दुसरीकडे पात्र असलेले काही जण डावलले गेल्याने मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. न्यायालयाचे काहींनी दरवाजे ठोठावले. हे प्रकरण गेले सहा सात वर्षे धूमसत होते. चुकीच्या पद्धतीने हा प्रकार झाल्याने विभागात ज्येष्ठता, अारक्षण व बिंदू नामावलीसारख्या महत्त्वाच्या बाबी पूर्णत्वास जात नव्हत्या. परिणामी इतरांच्या पदोन्नती व तत्सम बाबींना खीळ बसली होती. पात्र उमेदवारांना संधी मिळत नव्हत्या. याबाबत कृषी अायुक्तालयापर्यंत काहींनी कागदपत्रे सादर केली. अखेरीस या प्रकरणाला सोडविण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला. 

मंगळवारी (ता. १५) अमरावती विभागातील त्या डिमोशन होत असलेल्या पर्यवेक्षकांना पत्र देण्यात अाले. त्यांना मंगळवारी अमरावती येथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात अाले असून, त्यांना कृषी सहायक या मूळ पदावर पाठवले जाणार अाहे. या दिवशी संबंधितांना विनंती अर्ज, विकल्प देण्याबाबत कळविण्यात अाले. या तारखेनंतर जर अर्ज, विकल्प दिला तर तो ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचे कृषी सहसंचालकांनी स्पष्ट म्हटले अाहे.

 

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...