शेतकरीही उभारू शकतात मिनी फूड पार्क
शेतकरीही उभारू शकतात मिनी फूड पार्क

शेतकरीही उभारू शकतात मिनी फूड पार्क

अमृतसर, पंजाब ः मिनी फूड पार्कची उभारणी करण्यासाठी पंजाबमधील प्रगतिशील शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल. तसेच स्वयंसहायता गट अाणि सहकारी गटांच्या माध्यमातून छोटे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठीही शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली. ॲग्रो मरिन प्रोसेसिंग अँड डेव्हलमेंट अाॅफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टरर्स योजनेविषयीच्या (एसएएमपीएडीए) जागृती कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. मंत्री कौर बादल म्हणाल्या, की ‘एसएएमपीएडीए’ योजनेअंतर्गत छोटे उद्योजक अाणि शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षांत ६०० कोटी रुपये वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात अाले अाहे. शेतकरी उद्योजक व्हावेत, यासाठी यापूर्वी एवढे कधीही अनुदान दिले गेले नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या अाहेत. शेतकरी अनुदानाचा लाभ घेऊन अापले स्वतःचे मिनी फूड पार्क उभारू शकतात. शेतकरी एसएएमपीएडीए योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मदत तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीकडे चर्चा करण्यात अाली अाहे, असे त्यांनी नमूद केले. भाजीपाला प्रक्रिया उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना संधी अाहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे वळावे. किरकोळ क्षेत्रातील एकूण उलाढाल सहा अब्ज डॉलर एवढी अाहे. त्यात अन्न क्षेत्राचा ७० टक्के वाटा अाहे, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com