agriculture news in Marathi, agri produce transport subsidy scheme sanction, Maharashtra | Agrowon

शेतमाल वाहतूक अनुदान योजनेस पणन विभागाची मंजुरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे ः इंधन दरवाढीतून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीच्या खर्चात दिलासा मिळावा, यासाठी पणन मंडळाच्या वतीने आंतरराज्य शेतमाल रस्ते वाहतूक अनुदान याेजना लागू केली आहे. यामध्ये अतंराच्या विविध टप्प्यांनुसार ३० हजार ते ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र हे अनुदान वाहतूक खर्चाच्या ५० टक्के असणार असून, केवळ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांना लागू असणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पुणे ः इंधन दरवाढीतून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीच्या खर्चात दिलासा मिळावा, यासाठी पणन मंडळाच्या वतीने आंतरराज्य शेतमाल रस्ते वाहतूक अनुदान याेजना लागू केली आहे. यामध्ये अतंराच्या विविध टप्प्यांनुसार ३० हजार ते ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र हे अनुदान वाहतूक खर्चाच्या ५० टक्के असणार असून, केवळ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांना लागू असणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

पवार म्हणाले की, महाराष्ट्र फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात देशात आघाडीवर अाहे. शेतमालाच्या देशांतर्गत व्यापाराला चालना देण्याची गरज आहे. वाहतुकीच्या विलंबामुळे ३० टक्क्यांपर्यंत शेतमालाचे नुकसान हाेते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे; तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीमुळे शेतमाल वाहतुकीच्या दरातदेखील वाढ हाेत आहे. यामुळे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सुचनेनुसार शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान देता येईल का, याबाबत याेजना आखण्यात आली. या याेजनेतून ७५० ते २ हजार किलाेमीटरच्या विविध टप्प्यांवर अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान एकूण वाहतूक खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच ३० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

तसेच महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या राज्यांमध्येच शेतमाल वाहतूक हाेऊन याेजनेमध्ये गैरव्यवहार हाेऊ नये यासाठी पहिला टप्पा हा ७५० किलाेमीटरचा ठेवण्यात आला आहे. या याेजनेच्या लाभासाठी पणन मंडळाची पूर्वमान्यता आवश्यक असणार असून, यासाठी पणन मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे.

या पिकांसाठी याेजना 
आंबा, केळी, डाळिंब, द्राक्षे, संत्रा, माेसंबी, कांदा, टाेमॅटाे, आले आणि भाजीपाला पिकांसाठी असणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...