शेतमालाला हमीभावही मिळेना

शेतमाल
शेतमाल

अकोला :  सध्या मूग, उडीद, सोयाबीन तसेच कापूस या चारही प्रमुख पिकांना हमीभावसुद्धा मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले अाहेत. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाने २०१७-१८ या खरीप हंगामातील पिकांसाठी सुधारित हमीभाव जाहीर केले खरे; परंतु कुठल्याच बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून हमीभावाइतकाही भाव मिळेनासा झाला. सर्वत्र कमी भावाने धान्य खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र दिसत अाहे. या वर्षी सोयाबीन पिकाला २७७५ रुपये आधारभूत भाव व त्यामध्ये ७५ वाढ अधिक २०० रुपये बोनस असा प्रतिक्विंटल तीन हजार ५० रुपये एवढा भाव जाहीर झालेला अाहे. परंतु, बाजारात नवीन सोयाबीनची अावक सुरू झाली; तेव्हापासून अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये कुठल्याच बाजार समितीत हमीभावसुद्धा मिळेनासा झाला. कुठे १६०० ते तर कुठे १८०० हा कमीत कमी भाव मिळत अाहे. सर्वाधिक भाव २५०० रुपये दाखवला जात असला तरी अगदी बोटावर मोजण्याइतपत सोयाबीनला हा दर मिळतो अाहे. मूग, उडदाचीही अशीच अवस्था अाहे. मुगाला हमीभाव ५५७५ रुपये, तर उडदाला ५४०० रुपये दर जाहीर झालेला अाहे. सध्या मुगाची बाजारपेठेत अवघी चार हजार ते ४७०० दरम्यान विक्री केली जात अाहे. सरासरी ४४०० रुपये दर अाहे. म्हणजेच हमीभावापेक्षा ११०० रुपये कमी भेटत अाहेत. उडदाची तर याहीपेक्षा बिकट अवस्था अाहे.  उडीद अवघा ३२०० रुपयांपासून चार हजारांपर्यंत विकत अाहे. म्हणजेच प्रत्यक्षातील दर व हमीभाव यात १४०० रुपयांची तफावत अाहे. कापूस सध्या चार हजारांपर्यंत विकू लागला अाहे. सध्या शासनाने खरेदी केंद्र उघडले असून, लांब धाग्याच्या कापसाला ४३२० रुपये दर जाहीर केला अाहे. तर सर्वसाधारण धाग्याचा कापूस ४०२० रुपये दराने मागितला जातो. कापसाचा हमीभावच मुळात कमी अाहे. या वर्षी वेचाई पाच ते सात रुपये किलो द्यावी लागत अाहे. त्यातुलनेत मिळत असलेला दर हा अत्यंत कमी अाहे. हमीभाव, बाजारभावातील तफावत द्या ः जागर मंच बाजारात शेतमालाला हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाजारभावातील तफावत रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली अाहे. मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांची उत्पादकता घटलेली अाहे. शेतकऱ्यांना अार्थिक अडचणीमुळे अाधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत अाहे. शेतकरी शेतकरी हवालदिल झाला अाहे. शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले तर तेथे शेतमालात अार्द्रता १२ टक्क्यांपेक्षा कमी हवी असल्याने कुणाचाच माल घेतला जात नाही. ही अडचण तयार झाल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात माल विकण्याशिवाय पर्याय राहलेला नाही. शासनाने कोणतीही अट न लावता बाजारभाव व हमीभावातील जो फरक असेल तेवढी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर गावंडे, विजय देशमुख, प्रशांत नागे, दीपक गावंडे, शिवाजी म्हैसने अादींनी निवेदन दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com