agriculture news in marathi, agri research institutions in trouble, Maharashtra | Agrowon

देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी होण्याच्या मार्गावर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

देशाचे कृषिशास्त्रज्ञ मंडळ, संशोधन संचालनालय संस्था, आयसीएआरमधील निम्म्या जागा जर रिकाम्या ठेवल्या जात असतील, तर कृषी शिक्षण व संशोधनाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. यामुळे भारतीय शेतीची जगात पीछेहाट होईल. मोन्सॅन्टोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागेल.
 - डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष, कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळ
 

पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१ कृषी संशोधन संस्थांच्या संचालक पदांवर नियमित नियुक्त्याच केलेल्या नाहीत. तसेच देशभरातील कृषी संशोधन संस्थांसाठी शास्त्रज्ञांची निवड करण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळालाच गेल्या वर्षभरापासून नियमित अध्यक्ष नाही. तसेच मंडळाच्या दोन सदस्यांची पदेही रिक्त आहेत. सरकारचा उदासीन दृष्टिकोन आणि बेपर्वाईमुळे देशातील कृषी संशोधनाची व्यवस्थाच खिळखिळी होण्याच्या मार्गावर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्य प्रा. अनिलकुमार श्रीवास्तव यांच्याकडे मंडळाच्या अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी आहे. 

दोन सदस्यांची पदे रिक्तच आहेत. येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत नव्या सदस्यांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याचाच अर्थ चालू वर्षात मंडळाचे काम चालू होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मंडळाला सध्या कोणी वाली नसल्यामुळे १०३ पैकी ६१ संशोधन संस्थांना संचालक नाहीत. या संशोधन संस्थांचा कारभार भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखत्यारीत असतो. सध्या या परिषदेतील आठपैकी चार उपमहासंचालकांच्या जागा रिक्त आहेत. 

कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञांची निवड करण्याचा प्रघात आहे. परंतु, हा संकेत मोडून काढून या पदावर निवृत्त नोकरशहाला बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, कृषिशास्त्रज्ञांच्या भरतीमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या हेतूने मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट महिन्यातच मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार हे मंडळ आता `आयसीएआर`च्या नव्हे, तर कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत असेल. मंडळाच्या सदस्यांची संख्या एकने वाढवून चार करण्यात आली आहे. दरम्यान, माजी केंद्रीय कृषी सचिव डॉ. एस. के. पटनाईक यांची कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येणार असल्याची चर्चा दिल्लीतील शास्त्रज्ञांच्या वर्तुळात सुरू आहे. डॉ. पटनाईक हे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. 

प्रतिक्रिया
केंद्रीय कृषी मंत्रालयातील आयएएस मंडळी नेहमीच `आयसीएआर`च्या महासंचालकाला दाबण्याचा प्रयत्न करीत असतात. यापूर्वीच्या काही महासंचालकांनी अशी दादागिरी चालू दिली नव्हती. मात्र, आता शास्त्रज्ञ निवड मंडळावरच माजी आयएएस अधिकारी नेमण्याच्या हालचाली चिंताजनक आहेत. कृषिशास्त्रज्ञांची भरती करण्याची जबाबदारी एक उत्तम शास्त्रज्ञच निभावू शकतो. 
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन संस्था किंवा कृषी विद्यापीठांना पांढरा हत्ती म्हणून हिणवायचे, शास्त्रज्ञांच्या जागा भरायच्या नाहीत, निधीत कपात करायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत. देशाच्या कृषी इतिहासातील या मोठ्या घोडचुका आपण करीत असून, त्याचे परिणाम पुढील दहा वर्षांनंतर देशाला भोगावे लागतील.  
- डॉ. किसनराव लवांडे, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...