'कृषी स्टार्टअप' कंपन्यांसाठी महास्पर्धा

'कृषी स्टार्टअप' कंपन्यांसाठी महास्पर्धा
'कृषी स्टार्टअप' कंपन्यांसाठी महास्पर्धा

देशातील शेती क्षेत्रापुढील प्रमुख १२ समस्यांवर तोडगे शोधण्यासाठी कृषी मंत्रालयाने अभिनव मार्ग अवलंबला आहे. टेक्नॉलॉजी स्टार्टअप कंपन्यांनी हे आव्हान स्वीकारून नवीन सोल्युशन्स द्यावेत, यासाठी एक महास्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यातून पुढे येणाऱ्या किफायतशीर आणि अंमलबजाणीयोग्य कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृषी मंत्रालय या स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक व इतर मदत करणार आहे. केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनाईक यांनी ही माहिती दिली. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असे मत पटनाईक यांनी मांडले. ``शेती क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर आमचा भर आहे. देशातील शेती क्षेत्र ज्या प्रमुख आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर तोडगे शोधण्याची कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना ही उत्तम संधी आहे,`` असे पटनाईक म्हणाले. स्टार्टअप कंपन्यांवर मोठी भिस्त असून यासंदर्भात निधीची तरतूद करण्यात कोणतीही मर्यादा येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला अाहे, त्यामुळे आम्ही आता अन्नसुरक्षेऐवजी पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले. शेती क्षेत्रातील समस्या सोडविण्याच्या उद्देशाने कृषी मंत्रालयाने पहिल्यांदाच क्राउड सोर्सिंग सोल्युशन्स आणि स्टार्टअप इकोसिस्टिम यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले   आहे.  कृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांना पुढील समस्यांवर तोडगे शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे 

  • माती परीक्षणाची सोपी पद्धत
  • प्रतवारी सुविधा
  • ई-मार्केट प्लेसचा विकास
  • पेरणीच्या वेळीच बाजारभावाचा अंदाज वर्तवणे (प्राइस फोरकास्टिंग)
  • शेवटच्या घटकापर्यंत माहितीचा प्रसार
  • पीक उत्पादनाचे अंदाज
  • भेसळ चाचणी
  • कस्टम हायरिंग सेंटर्स (यंत्रसामग्री भाड्याने पुरवणे)
  • पिकांच्या अवशेषांची विल्हेवाट
  • शेतमालाचे काढणीपूर्व आणि काढणीपश्चात नुकसान टाळणे
  • शेती उत्पादकता वाढविणे
  • शेतमालाचा दर्जा ठरविणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com